शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
3
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
4
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
5
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
6
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
7
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
8
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
9
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
10
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
11
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
12
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
13
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
14
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
15
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
16
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
17
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
18
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
19
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
20
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

वणी उपविभागात ७५ टक्के मतदान

By admin | Updated: July 26, 2015 02:24 IST

वणी, पांढरकवडा, मारेगाव आणि झरी तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात शनिवारी ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले.

उमेदवारांचे भाग्य मशीनबंद : चिखली येथे मतदान यंत्रात बिघाड, पोलिसांसह राज्य राखीव दलाचा चोख बंदोबस्तवणी : वणी, पांढरकवडा, मारेगाव आणि झरी तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात शनिवारी ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. या चारही तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार जवळपास ७५ टक्केच्यावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वणी तालुक्यात तब्बल ६४४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोबतच पोटनिवडणुकीसाठी १९ उमेदवार होते. शनिवारी सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी झाली होती. मतदार रांगेने केंद्रात उभे होते. सध्या शेती कामाचे दिवस असल्याने मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. सकाळी ११ वाजतानंतर गर्दी थोडी ओसरली होती. त्यानतंर पुन्हा सायंकाळी ४ वाजतानंतर गर्दी उसळली होती. सायंकाळपर्यंत सुरळीत मतदान सुरू होते. मतदानाची निश्चित टक्केवारी मात्र अद्याप कळू शकली नाही.वणी तालुक्यातील वांजरी, येनक, झोला, वडगाव (टीप), टाकळी, शेलू (खु.), शिवणी (जहा.), साखरा (कोलगाव), परमडोह, निंबाळा (बु.), नेरड (पुरड), निळापूर, नांदेपेरा, मुंगोली, मोहदा, कोलगाव, कोना, कुर्ली, कळमना (खु.), गोवारी (कोना), ढाकोरी (बोरी), बोरगाव (मेंढोली), चनाखा, चिखली, राजूर (कॉलरी), बाबापूर, तेजापूर, पळसोनी, पठारपूर, निंबाळा (रोड), माथोली, मजरा, कुंड्रा, खांदला, कोलेरा, कृष्णानपूर, गोवारी (पार्डी), डोर्ली, भांदेवाडा, भुरकी, बोरी व चिलई या ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान पार पडले. या निवडणुकीतून ३१८ उमेदवार निवडून द्यावयाचे होते. त्यात १३८ पुरूष व १८० महिलांचा समावेश राहणार आहे. तालुक्यात राजूर (कॉलरी), नांदेपेरा, पठारपूर येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. पठारपूर हे माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे तेथील निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचेच लक्ष लागून आहे. पांढरकवडा तालुक्यात शांततेत झाले मतदानपांढरकवडा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात १० ग्रामपंचायतींसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात पाटणबोरी ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. तेथे सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. अनेकांना बराच वेळ ताटकळत राहवे लागले. तालुक्यात दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाली. शनिवारी ८० जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात २०१ उमेदवारांचे राजकीय भविष्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे. पाटणबोरी सोबतच उमरी रोड येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मारेगाव तालुक्यात ७९ टक्केमारेगाव तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी जवळपास ७९ टक्के मतदान झाले. मतदारांनी सकाळी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. आकापूर, दांडगाव, हिवरा-मजरा, कोलगाव, टाकळखेडा, मांगरूळ, टाकळी, कुंभा, करणवाडी येथे शांततेत मतदान पार पडले. २८ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. कुंभा येथील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून तेथील निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. मतदानासाठी तब्बल १२-१५ वर्षांपासून बाहेरगावी असलेल्या मतदारांनाही आणण्यात आले होते. झरी तालुक्यात मुकुटबनमध्ये चुरसझरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथे ८१ टक्केच्यावर मतदान झाले. तेथे अत्यंत चुरशीची लढत आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक प्रत्येक मतदाराला केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी धडपड करीत होते. झरी तालुक्यात २३ ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत पार पडले. झरी तालुक्यात जवळपास ७७ टक्केच्यावर मतदान झाले. (कार्यालय प्रतिनिधी)