दोन कोटी जमा : आठ हजार शेतकऱ्यांनी भरले बिलआॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकऱ्यांकडे ७४६ कोटींचे कृषी पंपाचे वीज बिल थकले आहे. ३० नोव्हेंरपर्यंत बिल न भरल्यास शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वीज कंपनीने दिला होता. या कालावधीत केवळ आठ हजार शेतकऱ्यांनाच बिल फेडता आले. तर ९८ हजार शेतकऱ्यांना वीज बिलाची परतफेडच करता आली नाही.शेतकऱ्यांनी कर्ज काढून सिंचन विहिरी बांधल्या. मात्र शेतमालाला भाव नसल्याने कर्जाची परतफेडच करता आली नाही. अशा स्थितीत थकीत वीज बिलाचे पैसे तत्काळ भरण्याच्या सूचना कंपनीने दिल्या आहेत. हे बिल थोडेथोडके नाहीतर लाख, दोन लाखांपर्यंत आहे. वीज बिल, विहिरीसाठी घेतलेले कर्ज आणि पिकासाठी घेतलेले कर्ज, अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.३० नोव्हेंबरपर्यंत आठ हजार शेतकºयांनी दोन कोटींची थकबाकी जमा केलीे. ९८ हजार शेतकºयांना छदामही भरता आला नाही. या स्थितीत वीज कापल्या गेल्यास सिंचनावर विपरित परिणाम होणार आहे.अनेकांना मीटरच नाहीकृषिपंपांना अवास्तव वीज बिल देण्यात आले. याकरिता आकारण्यात आलेले विजेचे युनीट अंदाजिच धरण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मीटरच नाही. विशेष म्हणजे, दररोज १५ तासांचं भारनियमन याठिकाणी लादण्यात आले आहे.हंगामाची भिस्त वीज पुरवठ्यावरचसंपूर्ण हंगामाची भिस्त सिंचनावर आहे. सिंचनासाठी लागणारी वीज गुल झाल्यास शेतकऱ्यांना पीकच घेता येणार नाही. यामुळे संकटावर मात करीत उभे केलेले पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान राज्य शासनाला भरून देणे अवघड होणार आहे.
कृषिपंपधारकांकडे ७४६ कोटी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:56 IST