शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

७४ कोटी मिळालेच नाही

By admin | Updated: March 5, 2017 00:54 IST

२०१५ मधील दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केली.

दुष्काळी मदत : न्यायालयाच्या निर्देशानंतरही अनुदान नाही यवतमाळ : २०१५ मधील दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केली. मात्र दोन वर्षे झाले तरी जिल्ह्याला मदत मिळाली नाही. हा निधी आचारसंहितेपूर्वी जिल्ह्याकडे वळता झाला. अजूनही तो शेतकऱ्यांच्या हातात पडला नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. अपुऱ्या पावसामुळे २०१५ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. यानंतरही जिल्ह्याला मदतीच्या यादीतून वगळण्यात आले होते. यानंतर राज्य शासानाने हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा केली. मात्र घोषणेनंतरही पैसे मिळाले नाही. यामुळे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याचे आदेश दिले. यानंतर राज्याने काही दिवसांपूर्वी जिल्ह्याकडे ७४ कोेटी वळते केले. या नंतरच्या काळात आचारसंहिता लागली. सर्वच अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने मदत वाटपाचे काम थांबले. यामुळे घोषणेची मदत शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरली आहे.२०१५ मध्ये अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वच शेतकऱ्यांना याचा फटका बसला. पीकविमा न उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यानुसार जिल्ह्यातील तीन लाख नऊ हजार ९९४ शेतकरी मदतीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. सोयाबीन उत्पादकांना ५४ कोटी तर कापूस उत्पादकांना १९ कोटी ६५ लाख रूपये मिळणार आहे. हा निधी जिल्ह्याकडे वळता झाला आहे. यातील सात कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. ६९ कोटी रूपये अजूनही जमा व्हायचे आहे. (शहर वार्ताहर) आचारसंहितेमुळे रक्कम थांबली जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेत ही रक्कम थांबली होती. आचारसंहिता संपताच आयुक्तांन पैसे वितरणाची कारवाई तत्काळ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. यातून जिल्हा प्रशासनाने सोमवारी तत्काळ बैठक बोलावली आहे. शेतकऱ्यांची मदत वाटप करण्यासाठी यादीसोबत आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. ६ ते ११ मार्चच्या सुमारास ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जाणार आहे.