शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नेर नगर परिषदेत ७३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 21:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी २९ मतदान केंद्रांवर ७३.१५ टक्के मतदान झाले. प्रभाग ९ चा अपवाद ...

ठळक मुद्दे१८ नगरसेवकांचे भाग्य यंत्रबंद : प्रभाग ९ मध्ये राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीने गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी २९ मतदान केंद्रांवर ७३.१५ टक्के मतदान झाले. प्रभाग ९ चा अपवाद वगळता दिवसभर शांततेत मतदान पार पडले.एकूण १५ हजार १८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात आठ हजार ५८ पुरुष (७५.१४ टक्के), तर सात हजार १३१ महिला (७१.०२ टक्के) मतदारांचा समावेश आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दुचाकीवर बसून सर्व बुथचा आढावा घेतला. त्यांच्यासह इतर पक्षातील नेतेही दिवसभर शहरात हजर होते. अशोकनगर परिसरात महसूल राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीवर स्थानिक उमेदवारांनी आक्षेप घेतल्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. एसडीपीओ नीलेश पांडे, ठाणेदार अनिल किनगे यांनी वेळीच दक्षता घेत गोंधळ थांबविला.सकाळपासूनच मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे दिवसभरात ७३.१५ टक्के मतदान झाले. महिला, वृद्ध यांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला प्रतिसाद दिला. शहरात एकंदर २९ बुथवर मतदान पार पडले. सहा संवेदनशील बुथवरही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नऊ प्रभागांसाठी १८ नगरसेवकांचे भवितव्य मशीनबंद झाले आहे. या १८ जागांसाठी ९३ उमेदवार रिंगणात होते. तर नगराध्यक्ष पदासाठी पाच महिला उमेदवार रिंगणात होत्या.मतदान शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे, उपनिवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र चिंतकुंटलावार, मुख्याधिकारी नीलेश जाधव यांनी काम पाहिले, तर एसडीपीओ नीलेश पांडे, ठाणेदार अनिल किनगे यांनी बंदोबस्त ठेवला.आज सकाळी १० वाजता मतमोजणीनेर नगरपरिषदेसाठी रविवारी २९ ईव्हीएमवर मतदान झाले. तर लगेच सोमवारी १० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. क्रीडा संकुलात सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने शहरवासीयांसह जिल्हाभरातील नागरिकांच्या नजरा मतमोजणीकडे लागलेल्या आहेत. दुपारी १२ वाजतापर्यंत नगरपरिषदेवर कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक