शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

७०० गावे टंचाईच्या सावटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:42 IST

यावर्षी अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. प्रशासनाने साडेचार कोटींचा कृती आराखडा तयार केला असला तरी उपाययोजना कागदावरच दिसत आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई उपाययोजना कागदावरच : साडेचार कोटींचा कृती आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. प्रशासनाने साडेचार कोटींचा कृती आराखडा तयार केला असला तरी उपाययोजना कागदावरच दिसत आहे.यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शासनाने दुष्काळ सदृश परिस्थितीही घोषित केली. अपुºया पावसामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जलयुक्तशिवार आणि वॉटर कप स्पर्धा राबवूनही अनेक गावे तहानलेली आहे. येत्या उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. जून २०१९ अखेरपर्यंत सुमारे ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचण्याची शक्यता आहे. या गावांमध्ये विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. त्याला जिल्हाधिकाºयांनी मंजुरीही दिली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान सुमारे २६९ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे. याशिवाय एप्रिल ते जूनपर्यंत आणखी ४३१ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हाभरात तब्बल ६६४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. सोबतच ८९ ठिकाणी टँकर अथवा बैलबंडीद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी चार कोटी ४७ लाख ६२ हजारांचा खर्च अपेक्षित आहे.मागील वर्षीच्या अनेक योजना रखडल्यागेल्या वर्षी पाणीपुरवठ्यासाठी विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला. मात्र अनेक ठिकाणच्या योजना रखडल्या आहे. काही गावांमध्ये निधीअभावी योजना ठप्प पडल्या आहेत. काही गावांमध्ये गाव समितीच्या वादातून योजना रखडल्या आहे. अनेक ठिकाणी पाईपही पोहोचले नाही. काही ठिकाणी विंधन विहिरी खोदूनही पाणी लागले नाही. त्याऐवजी दुसºया ठिकाणी विंधन विहीर केली गेली नाही. यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.