शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

७० हजार कामगारांच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:00 IST

राज्य शासनाने कामगाराची व्याख्या व्यापक केली आहे. यामुळे कामगार कार्यालयाकडे मजूर नोंदणीचा आकडा ७० हजारांवर पोहोचला आहे. या नोंदणीत काही बोगस कामगार शिरण्याचा धोका आहे. याला अटकाव घालण्यासाठी हमीपत्र लिहून घेतले जात आहे.

ठळक मुद्देविदर्भात यवतमाळ तिसऱ्या स्थानी : बोगस कामगारांना रोखण्यासाठी तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने कामगाराची व्याख्या व्यापक केली आहे. यामुळे कामगार कार्यालयाकडे मजूर नोंदणीचा आकडा ७० हजारांवर पोहोचला आहे. या नोंदणीत काही बोगस कामगार शिरण्याचा धोका आहे. याला अटकाव घालण्यासाठी हमीपत्र लिहून घेतले जात आहे. त्याची तपासणी केली जात आहे. बोगस कामगारांची तक्रार आल्यास त्यावर थेट कायदेशीर कारवाई होणार आहे.जिल्हा कामगार कार्यालयामार्फत कामगारांच्या नोंदी करून घेतल्या जात आहे. प्रारंभी बांधकाम मजुराच्या नोंदी कामगार कार्यालयाकडून केल्या जात होत्या. विटभट्टया, क्रेशर कामगार, सुतार, पेंटर आणि वडार आदी कामगारांच्या नोंदी करण्याचे आदेश कामगार कार्यालयाने दिले आहेत. त्याकरिता ९० दिवसांच्या कामकाजाचे पत्र बंधनकारक आहे. शहरी भागात मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात ग्रामसेवकांकडून असे पत्र घेतले जात आहे. यासोबत मजूर असल्याचे स्वयंघोषणापत्र मजुराकडून लिहून घेतले जात आहे. यामुळे बोगस कामगाराची तक्रार केल्यास संबंधित कामगाराची चौकशी होऊन त्यावर थेट कारवाई केली जाणार आहे. यामुळे गरजू मजुरांना त्यांचे सुरक्षा कवच आणि विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. संपूर्ण विदर्भात मजूर नोंदणी कामात नागपूर प्रथम, अमरावती दुसºया तर ७० हजार नोंदणीसह यवतमाळ जिल्हा तिसºया क्रमांकावर पोहोचला आहे.मजुरांसाठी ११ कोटी वळतेमजुरांना अत्यावश्यक साहित्य खरेदी आणि विविध योजनासह कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ११ कोटी वळते करण्यात आले आहे. यामधील आठ हजार ३२० मजुरांच्या खात्यात चार कोटी १६ लाख तर दोन हजार ७५९ मजुरांच्या खात्यात कामगार सुरक्षा आणि शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या नावाने तीन कोटी ५० लाख रूपये वळते झाले आहे.कुटुंबात एकाच व्यक्तीला अत्यावश्यक अवजाराचा निधी मिळणार आहे. यासोबतच बोगस मजुरांच्या तक्रारी आल्यास त्यांची चौकशी होऊन कारवाई होईल.- राजदीप धुर्वेजिल्हा कामगार अधिकारी, यवतमाळ