शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

जिल्ह्यात सिंचनासाठी ६८७ कोटी

By admin | Updated: July 13, 2015 00:11 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पथदर्शी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय रविवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाचा निर्णय : १२०७ ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक लाखांचा निधी यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पथदर्शी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय रविवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सिंचनासाठी तीन वर्षात ६८७ रुपये देण्यात येणार असून जिल्ह्यातील १२०७ ग्रामपंचायतीला प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यासोबतच बळीराजा चेतना अभियानासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी हा महत्वपूर्ण कार्यक्रम घोषित करण्यात आला. सिंचनाद्वारे शेतकऱ्यांना ओलिताची सोय उपलब्ध करून देण्याअंतर्गत जिल्ह्यातील १६ प्रकल्पांना या वर्षासह पुढील तीन वर्षात ६८७ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी १९८ कोटी रुपये दिले जातील. २०१६-१७ मध्ये २७४ कोटी आणि २०१७-१८ मध्ये २१३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष पथदर्शी कार्यक्रम तीन वर्षाचा असून त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेत विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. हा कक्ष शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे समन्वय करून अधिकाधिक शेतकऱ्यांंना लाभ देण्यासाठी काम करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील हा कक्ष कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसोबतच शेतकरी योजनांचे समन्वयन व आत्महत्याग्रस्तांचे सर्वेक्षण, योजनांची माहिती, आढावा घेतला जाईल, या समितीत जिल्हाधिकारी अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी सचिव राहतील. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील महत्वपूर्ण अधिकाऱ्यांचा सदस्य म्हणून समितीत समावेश राहणार आहे. ही समिती जिल्हा नियोजन समितीला उत्तरदायी राहील. पालकमंत्री वेळोवेळी समितीच्या कामकाजाचा आढावा घेतील. समितीच्या कामकाजासाठी शासनाने १० कोटी रुपये मंजूर केले आहे. ग्रामस्तरावरही सरपंचाच्या अध्यक्षतेत समित्या स्थापन केल्या जातील. तसेच यवतमाळसह ग्रामीण रुग्णालयात मानोसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)

पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश बळीराजा चेतना अभियान जिल्ह्यातील शेतकऱ्यांंना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी नाटक, प्रवचन, पथनाट्य, कीर्तन, पोवाडे आदी द्वारे जनजागृती कार्यक्रम घेतले जातील. पालकमंत्री या अभियानाचे अध्यक्ष राहणार असून जिल्हाधिकारी सदस्य सचिव आणि बहुतांश सर्व अधिकारी सदस्य राहतील. अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. ४शासनाने शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी जिल्ह्यात सात उपविभागात सात सचिव दर्जाचे अधिकारी नेमले आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये उणिवा असल्यास त्या परस्पर दुरुस्त करण्याचे अधिकार या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात आत्महत्या झाल्यास सदर आत्महत्या थांबविता आली नसती का याबाबतची कारणमीमांसा करून १५ दिवसात सदर सचिवांना मुख्यमंत्र्यास अहवाल सादर करावा लागेल. तशी बाब आजच्या निर्णयात नोंदविण्यात आली आहे.