शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरकरिता ६७.४१ टक्के मतदान

By admin | Updated: February 4, 2017 01:04 IST

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ६७.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

नावे गहाळ : सोमवारी अमरावतीत मतमोजणी यवतमाळ : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ६७.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर अनेक मतदारांना यादीत नाव नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले. यामुळे अनेकांनी संतापही नोंदविला. सोमवारी अमरावतीला मतमोजणी होणार आहे. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीकरिता जिल्ह्यातील ४८ मतदान केंद्रांवर शुक्रवारी मतदानाची प्रक्रीया पार पडली. यवतमाळ शहरातील १४ मतदान केंद्रांवर दिवसभर प्रचंड वर्दळ होती. अशीच स्थिती जिल्ह्यातील इतर मतदान केंद्रावर होती. मतदारांचे नाव मतदारांना शोधता यावे म्हणून ठिकठिकाणी बुथ लावण्यात आले होते. या ठिकाणी मतदारांची आॅनलाईन यादी तपासण्याचे काम पार पाडल्या जात होते. दुपारच्या सुमारास मतदारांची सर्वाधिक वर्दळ राहिली. दुपारी १२ पर्यंत २५ टक्के मतदान पार पडले होते. तर २ पर्यंत ४५.८६ टक्के मतदान झाले. सायंकाळी ४ पर्यंत २२ हजार २४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुसद येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर दुपारी रांग लागली होती. मतदारांचे नाव तत्काळ शोेधता यावे म्हणून संंकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आले होते. यासोबत ठिकठिकाणी बुथ लावण्यात आले होते. यानंतरही अनेक मतदारांना आपले नाव मतदार यादीत सापडले नाही. यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. याबाबत अनेकांनी संताप नोंदविला. सोमवारी ६ तारखेला अमरावतीला मतमोजणीची प्रक्रीया पार पडणार आहे. यामुळे १३ उमेदवारांना तूर्त प्रतीक्षा करावी लागणार आहे. (शहर वार्ताहर)