शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

६५ लाखांचा पथदिवे घोटाळा

By admin | Updated: August 7, 2014 00:02 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येथील नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात ३१२ सौर पथदिवे लावण्यात आले. याची कुठलीही निविदा न काढता आणि तांत्रिक कामे करण्याचे अधिकार नसताना

जिल्हा क्रीडा कार्यालय : जिल्हाधिकाऱ्यांचीही दिशाभूल सतीश येटरे - यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येथील नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात ३१२ सौर पथदिवे लावण्यात आले. याची कुठलीही निविदा न काढता आणि तांत्रिक कामे करण्याचे अधिकार नसताना तज्ञाविनाच काम पूर्ण केले. यात ६४ लाख ५३ हजार ७२० रुपयांचे चढ्या दराने देयक काढून जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे, हे विशेष. शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा प्रशासनाच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये आणि परिसरात सौर पथदिवे लावण्यात आले. येथील नेहरू स्टेडियममधील प्रांगणातही ३१२ सौर पथदिवे लावण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला काही अटी आणि शर्ती ठेऊन मंजूरात देण्यात आली. मंजुरातीनंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने कामाची निविदा काढने गरजेचे होते. शिवाय हे काम १० लाखांवरील असल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे जाहिरात देऊन निविदा मागवायला हव्या होत्या. मात्र तसे न करता विशिष्ट कंपन्यांचे कोटेशन घेण्यात आले. तसेच केंद्रातील एका मंत्र्याच्या संस्थेला हा कंत्राट परस्पर देण्यात आला. ३१२ लोखंडी पोल, तेवढ्याच बॅटरी आणि लाईट, केबल असे साहित्य त्यासाठी लागणार होते.शेगाव येथील गजानन महाराज संस्थान निर्मिती करीत असलेल्या दर्जेदार सोलर पथदिव्याची किंमत ११ हजार रुपये आहे. असे असताना २२ हजार रुपयात एक सोलर पथदिवा याप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने मर्जीतील कंपनीला कंत्राट दिला. ३ फेब्रुवारीला या कामाचे आदेश काढण्यात आले तर २५ मार्चला देयकही देण्यात आले. ई-टेंडरींग अथवा निविदेची जाहिरात न देता अधिकाऱ्यांनी लाखोंचे कमीशन त्यामध्ये लाटल्याचे पुढे आले आहे.विशेष असे की, वीज वितरण कंपनीचे अभियंता अथवा खासगी तज्ञाला यासाठी नेमावे लागते. मात्र कमिशनखोरी करताना त्याची अडचण निर्माण होईल म्हणून कुणालाच नेमले नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी हे पद तांत्रिक नाही त्यामुळे त्यांना विद्युत कामे करण्याचे अधिकार नाही. असे असताना हा प्रकार करण्यात आला.