रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आता कात टाकली आहे. त्यांचे आरोग्यवर्धीनी केंद्रात रुपांतर होत आहे. यामुळे केंद्राच्या वास्तूचा चेहरामोहरा बदलविला जाणार आहे. या केंद्रात साथरोग औषधांसह हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोगावरील औषध मिळणार आहे. ही संपूर्ण केंदे्र एमबीबीएस डॉक्टरांच्या नियंत्रणात असणार आहे.केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्यवर्धीनी केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. जिल्हा पातळीवर केंद्र तयार करण्याचे पहिल्या टप्प्यातील काम ३१ मे रोजी पूर्ण करण्यात आले. आता जिल्ह्यातील ६१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फलक बदलविण्यात आले. या केंद्राचे नामकरण आता आरोग्यवर्धीनी केंद्र असे करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्राला चार लाख रूपयांचा दुरुस्ती निधी वळता केला जाणार आहे. त्यातून केंद्राची रंगरंगोटी, बाह्यस्वरूप, आतील फर्नीचर बसविण्याचे काम केले जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आता एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहे.जिल्ह्यात यापूर्वी ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर होते. आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नव्हते. आता त्या केंद्रातही एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती झाल्यामुळे केंद्रात येणाऱ्या रूग्णांना साथ आजाराचीच औषधी नव्हे तर हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाबाची औषधी उपलब्ध होणार आहे. यामुळे रूग्णांना स्थानिक पातळीवरच उपचार करणे शक्य होणार आहे. आरोग्य केंद्रासोबतच जिल्ह्यातील ४०२ उपकेंद्रांवरही हीच पद्धत लागू केली जाणार आहे. उपकेंद्रांनाही दुरूस्तीसाठी प्रत्येकी सात लाखांचा निधी दिला जाणार आहे. त्यातून ही केंद्रे आता अद्ययावत होणार आहे.कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारकप्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी निश्चित वेळेवर पोहोचत नाही, अशा तक्रारी असतात. यावर मात करण्यासाठी आता कर्मचाºयांना बायोमेट्रीक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. मशीनची तपासणीनंतरच त्यांना दरमहा वेतन दिले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यानंतर उपकेंद्रातही बायोमेट्रीक मशीन बसविली जाणार आहे.
६१ प्राथमिक आरोग्य केंद्रांनी टाकली कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 22:17 IST
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आता कात टाकली आहे. त्यांचे आरोग्यवर्धीनी केंद्रात रुपांतर होत आहे. यामुळे केंद्राच्या वास्तूचा चेहरामोहरा बदलविला जाणार आहे. या केंद्रात साथरोग औषधांसह हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोगावरील औषध मिळणार आहे.
६१ प्राथमिक आरोग्य केंद्रांनी टाकली कात
ठळक मुद्देऔषध मिळणार : हार्ट, शुगर, बीपी, कॅन्सरवर औषध देणार, प्रत्येक केंद्रात आता एमबीबीएस डॉक्टर राहणार