शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

६१ टक्के कमी दराची निविदा !

By admin | Updated: March 12, 2015 02:14 IST

जिल्हा परिषदेत कामे मिळविण्यासाठी केला जाणारा कमिशनचा व्यवहार सर्वश्रृत आहे. आता मात्र ठेकेदारांच्या स्पर्धेचा कडेलोट झाला आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषदेत कामे मिळविण्यासाठी केला जाणारा कमिशनचा व्यवहार सर्वश्रृत आहे. आता मात्र ठेकेदारांच्या स्पर्धेचा कडेलोट झाला आहे. काम मिळविण्यासाठी चक्क ४२ टक्के कमी दराची निविदा दाखल केली. सोबतच या कंत्राटदाराला ८ टक्के कमिशन आणि ११ टक्के विविध कर मिळून एकूण ६१ टक्के कमी दराची निविदा मान्य करण्यात आली आहे. नियमानूसार कोणतेही कंत्राट ५० टक्के कमी दराने देता येत नाही. त्यानंतरही बांधकाम विभाग क्रमांक-१ ने हा पराक्रम केला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक-१ मध्ये नेहमीच कामात गोंधळ घातला जातो. टक्केवारीचे गणित सोडविणाऱ्या कंत्राटदाराला काम दिले जाते. जिल्हा परिषदेतील ई- निविदा प्रणालीसुध्दा अनेकदा मॅनेज करण्यात आली आहे. याबाबतचे सबळ पुरावे हाती लागल्यानंतरही कोणतीच कार्यवाही झाली. आता तर यंत्रणेने चक्क ६१ टक्के कमी दराची निविद मंजूर करून शासकीय रकमेच्या बचतीचा एक नवा विक्रम केला आहे. मारेगाव तालुक्यातील खैरगाव कोथुर्ला येथे आदिवासी उपाय योजनेतून १९ लाख ७९ हजार २३७ रुपयांचा पांदन रस्ता मंजूर करण्यात आला. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली खोदून त्यावर मुरूम टाकण्याचे काम अपेक्षित आहे. या कामासाठी कंत्राटदारांनी मोठी स्पर्धा केली असून शेवटची निविदा ही तब्बल ४२ टक्के कमी दराची होती. विशेष म्हणजे हे काम शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांच्या सर्कलमध्ये येते. त्यानंतरही या कामाच्या वाटपात मोठा गोंधळ घातला जात आहे. ही सर्व कामे झरीजामणी, पांढरकवडा, मारेगाव या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये आहे. या दुर्गम भागात काम होते की नाही, त्याची गुणवत्ता कशी हे तपासण्यासाठी कोणीच फिरकत नसल्याने कंत्राटदराकडून अतिशय कमी दरात काम घेण्याची स्पर्धाच लागली आहे. अनेक ठिकाणी तर यापूर्वी झालेल्या कामावरच नवीन काम दाखवून रक्कम लाटली आहे. याचीच पुनरावृत्ती याही निविदा प्रकियेत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बांधकाम विभागातील पदाधिकारी, अधिकारी आणि कंत्राटदार यांची साखळी तोडण्याचे आव्हान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासमोर उभे ठाकले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)