शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जमादाराच्या घरून ६० ग्रॅम दागिने लंपास

By admin | Updated: August 7, 2014 00:02 IST

पॉलिशच्या नावाखाली दोन भामट्यांनी पोलीस जमादाराच्या पत्नीचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत बुधवारी दुपारी ११ वाजता घडली.

पॉलिशचे निमित्त : पत्नीला घातला गंडा यवतमाळ : पॉलिशच्या नावाखाली दोन भामट्यांनी पोलीस जमादाराच्या पत्नीचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत बुधवारी दुपारी ११ वाजता घडली. वंदना राजेश तिवारी असे दागिने लंपास झालेल्या महिलेचे नाव आहे. राजेश तिवारी पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी सुटा-बुटात असलेले दोन तरूण त्यांच्याकडे आले. यावेळी दागिने चमकून देतो असे त्यांनी जमादार तिवारी यांना सांगितले. तसेच दागिने चमकविण्यासाठी कुठलेही शुल्क घेण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून चांदीचे ताट आणि ग्लास चमकविण्यासाठी दिले. त्यांनीही पावडर आणि हळद लावून ते चमकवून दिले. त्यानंतर हे तरूण तेथून निघून गेले. दरम्यान बुधवारी दुपारी ते तरूण पुन्हा तिवारी यांच्याकडे आले. त्यावेळी राजेश तिवारी कर्तव्यावर होते. त्यांची पत्नी घरी होती. त्यांनी आपल्या हातातील ६० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चमकविण्यासाठी दिल्या. त्यांनी सुरूवातीला या बांगड्यांना पावडर लावले, त्यानंतर घरातून एक डबा आणि हळद आणायला सांगितली. त्यांनी डबा आणि हळद आणली. बांगड्यांना हळद घासून वंदना तिवारी यांनाच डब्यात ठेवण्यास सांगितले. दरम्यान थोड्यावेळाने बांगड्या पाण्याने स्वच्छ करण्याचा सल्ला देऊन ते तरूण निघाले. दरम्यान वंदना तिवारी यांनी शंका आली. त्यांनी डबा उघडून पाहिला तर त्यामध्ये बांगड्या नव्हत्या. केवळ हळदीची पेस्ट आढळून आली. हातचलाखी करून बांगड्या लंपास केल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ ही माहिती पती राजेश यांना दिली. तोवर चोरटे पसार झाले होते. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी वडगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (स्थानिक प्रतिनिधी)