शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पालिका, नगरपंचायतींना सहा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 21:38 IST

यवतमाळ नगरपरिषदेला ६५ लाख, वणी, पुसद, दिग्रस, उमरखेड या नगरपालिकांना प्रत्येकी ५० लाख, दारव्हा, पांढरकवडा, घाटंजी, नेर नबाबपूर, आर्णी नगरपरिषदेला प्रत्येकी ३५ लाखांचा निधी आला आहे. तर झरी जामणी, बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव, महागाव, कळंब, ढाणकी या नगरपंचायतींना प्रत्येकी २० लाख रुपये सर्वसाधारण रस्ता अनुदान प्राप्त झाले आहे. राज्य शासनाने २० ऑगस्ट रोजी अध्यादेश काढून हे रस्ता अनुदान वितरित केले आहे.

ठळक मुद्देसर्वसाधारण रस्ता अनुदान : दहा लाखांपेक्षा कमी कामांना एकत्रित मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरविकास विभागाने राज्यातील सर्वच नगरपरिषद, नगरपंचायतींना सर्वसाधारण रस्ता अनुदान दिले आहेत. तब्बल दीडशे कोटी ९५ लाखांची तरतूद राज्यस्तरावरून झाली आहे. यातील पाच कोटी ८० लाख रुपये यवतमाळ जिल्ह्याच्या वाटेला आले असून १७ नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये वितरित केले जाणार आहे. हा निधी बीडीएसवर उपलब्ध झाला आहे.यवतमाळ नगरपरिषदेला ६५ लाख, वणी, पुसद, दिग्रस, उमरखेड या नगरपालिकांना प्रत्येकी ५० लाख, दारव्हा, पांढरकवडा, घाटंजी, नेर नबाबपूर, आर्णी नगरपरिषदेला प्रत्येकी ३५ लाखांचा निधी आला आहे. तर झरी जामणी, बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव, महागाव, कळंब, ढाणकी या नगरपंचायतींना प्रत्येकी २० लाख रुपये सर्वसाधारण रस्ता अनुदान प्राप्त झाले आहे. राज्य शासनाने २० ऑगस्ट रोजी अध्यादेश काढून हे रस्ता अनुदान वितरित केले आहे. यामध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात वितरित केलेला निधी १०० टक्के खर्च झाल्याचे विनियोग प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. याची खातरजमा केल्यानंतरच नवीन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी उपयोगिता प्रमाणपत्र देयकासोबत जिल्हा कोषागारात सादर करावे लागणार आहे.याशिवाय यापूर्वी खर्च केलेल्या निधीच्या अनुषंगाने लेखा परीक्षक, महालेखापाल यांच्याकडून कोणताच गंभीर आक्षेप नाही, याची खातरजमा करणेही आवश्यक आहे.विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी शहरातील रस्त्यांच्या कामांना गती मिळावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्थांना पाच कोटी ८० लाखांचा निधी देऊन रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे.निवडणुकीवर डोळा ठेऊन रस्त्यांची डागडुजीविधानसभा निडणुकीत शहरी मतदारांना प्रभावित करण्यासाठी रस्ते डागडुजीवर भर दिला जात आहे. याकरिता नगरपरिषद, नगरपंचायतींना निधी दिला असून त्याचा तातडीने विनियोग करण्याचे निर्देश आहेत. इतकेच नव्हे तर दहा लाखापेक्षा कमी किंमतीची कामे असल्यास त्याची एकत्रित ई-निविदा काढून प्रशासकीय मंजुरी घेणे आवश्यक आहे. आता निवडणुकीचा बिगूल वाजण्यापूर्वी शहरांमध्ये भूमिपूजनाचा कुदळा खणकताना दिसणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत