शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

५७ हजार लाभार्थी घरकुलापासून वंचित

By admin | Updated: September 29, 2016 01:20 IST

घरकुलासाठी अस्तिवात आलेली ‘जनरेटेड प्रायोरीटी लीस्ट’ अर्थात जीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील अर्थात बीपीएल जनतेचे सर्व लाभ बंद करण्याचे षड्यंत्र आहे.

यवतमाळ : घरकुलासाठी अस्तिवात आलेली ‘जनरेटेड प्रायोरीटी लीस्ट’ अर्थात जीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील अर्थात बीपीएल जनतेचे सर्व लाभ बंद करण्याचे षड्यंत्र आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक गरजवंत घरकुलापासून वंचित राहणार आहे. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आणि गरजवंतांना घरकूल मिळवून देण्याच्या मागणीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गरीबांना दारिद्र्य रेषेखालील यादीतून बाद करून जागतिक पातळीवर देश दारिद्र्यमुक्त झाल्याचे दर्शवून आपली प्रतिमा उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार प्रयत्नशील असल्याचा आरोप पवार यांनी केला. त्यासाठी देश पातळीवर मोठे षड्यंत्र रचले जात आहे. बीपीएल प्रतीक्षा यादीतील गरजवंतांना पूर्वी घरकूल देण्यात येत होते. आता त्याऐवजी जीपीएल आणण्यात आले. त्यात जवळपास १३ जाचक अटी आहे. त्यानुसार लाभार्थ्यांकडे कुडाचे घर असेल, मात्र त्याच्याकडे दुचाकी, टी.व्ही., फ्रीज आदी वस्तू असेल तर त्याला यापुढे घरकूल मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला. जिल्ह्यात २00२ मध्ये पाच लाख पाच हजार २४0 कुटुंब होते. त्यापैकी दोन लाख ३0 हजार २८३ कुटुंब दारिद्र्य रेषेखालील प्रतीक्षा यादीत होते. त्यानंतर अपिलातून पुन्हा ३२ हजार ७२४ कुटुंब त्यात समाविष्ट झाले. तसेच २0११ मध्ये केंद्रातील तत्कालीन आघाडी शासनाने आर्थिक, सामाजिक, जात गणना केली. त्यात बीपीएलचाही समावेश होता. जिल्ह्यात एक लाख २0 हजार ८१८ नागरिक बीपीएलच्या कायम प्रतीक्षा यादीत होते. मात्र आता हे सर्व रद्द करून केंद्र शासनाने ‘जीपीएल’ योजना आणली. त्यात केवळ ६२ हजार ५५६ कुटुंबाचा समावेश आहे. आता या यादीतूनही १३ जाचक अटी लादून नावे वगळण्याचे निर्देश ग्रामसभांना देण्यात आले. यातून गावागावांत भानगडी होत आहे. गावोगावी हाणामारी होत आहे. बीपीएलकडून लक्ष वळविण्यासाठी हा सर्व प्रकार केला जात असून मागेल त्याला घर देण्याची मागणी देवानंद पवार यांनी केली. प्रधानमंत्री आवास योजनेतील जाचक अटी रद्द करून विशेष बाब म्हणून १५ एकरापर्यंत शेती असलेल्यांनाही घरकूल देण्याच्या मागणीसाठी मोर्चा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, भीमराव राठोड, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरूण राऊत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)