शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जिल्हा परिषद सभागृहात दिसणार ५७ नवीन चेहरे

By admin | Updated: February 27, 2017 00:47 IST

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ५७ सदस्य नवखे निवडून आले असून १९६२ मध्ये जिल्हा परिषद स्थापन झाल्यानंतर जशी सदस्यांची स्थिती होती,

केवळ चारच अनुभवी : प्रशासनाला पहिल्या सभेची उत्सुकता रवींद्र चांदेकर  यवतमाळ जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ५७ सदस्य नवखे निवडून आले असून १९६२ मध्ये जिल्हा परिषद स्थापन झाल्यानंतर जशी सदस्यांची स्थिती होती, तशीच यंदा जिल्हा परिषद सभागृहाची झाली आहे. केवळ चार सदस्य अनुभवी असून तेही आपल्या कार्यकाळात फारसे आक्रमक नव्हते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सदस्यांवर प्रशासन हावी होणार, हे निश्चित. ६१ सदस्यांपैकी तब्बल ५७ सदस्य पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची पायरी चढत आहे. यापूर्वी ते कधीही जिल्हा परिषदेचे सदस्य नव्हते. उर्वरित चार सदस्य एकदा जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यामुळे यावेळी अननुभवी सदस्यांची गर्दी वाढली आहे. यापूर्वीच्या सभागृहात अनेक अनुभवी आणि अभ्यासू सदस्य होते. त्यात बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, देवानंद पवार, अमोल राठोड आदींचा समावेश होता. हे सर्व सदस्य दोन किंवा त्यापेक्षा जास्तवेळ जिल्हा परिषदेत निवडून आले होते. मात्र यावेळी काहींनी रिंगणातूनच माघार घेतली, तर काहींना निवडणूक लढवूनही अपयश आले. परिणामी अनेक अननुभवी सदस्य जिल्हा परिषदेत पोहोचले आहेत. चार अनुभवी सदस्यांमध्ये वरध-झाडगाव गटातून विजयी झालेले भाजपाचे चित्तरंजन कोल्हे, नांझा-मेंढला गटातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या जया पोटे, मुडाणा-फुलसावंगीतून विजयी झालेले शिवसेनेचे डॉ. बी.एन. चव्हाण आणि मोख-आरंभी गटातून विजयी झालेल्या शिवसेनेच्या विद्यमान सदस्य डॉ. रूक्मीणी उकंडे यांचा समावेश आहे. हे चारही सदस्य अभ्यासू असल्याचे यापूर्वी दिसून आले. या निवडणुकीत तातू देशमुख, देवानंद पवार, दादाराव गव्हाळे, महादेव सुपारे, सीमा तेलंगे, शरद चिकाटे, मंगल मडावी, योगेश पारवेकर, सुलोचना भोयर, सुभाष ठोकळ, लता खांदवे, आरती फुपाटे, मुबारक तंवर, ययाती नाईक, गोदावरी इंगळे आदी आजी-माजी सदस्यांचा पराभव झाला. ते सभागृहात पोहोचले असते, तर अभ्यास व सभागृह दणाणून सोडणाऱ्या सदस्यांचा कोरम पूर्ण झाला असता. आता ही जबाबदारी नवख्या सदस्यांवर येऊन पडली आहे. अन्यता प्रशासन त्यांच्यावर भारी पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा वचक राहणार जिल्हा परिषदेत बहुतांश सदस्य नवखे असले, तरी यापुढे प्रशासनावर शिवसेनेचा वचक राहण्याची शक्यता आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या विश्वासातील सदस्य अध्यक्षपदी आरूढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांचा जिल्हा परिषदेतील वावर वाढणार आहे. त्यांचे बंधू विजय राठोड यांच्या हाती सर्व सूत्रे राहण्याची शक्यता आहे. कदाचित उपाध्यक्षपदी विजय राठोड विराजमान होण्याचीही दाट शक्यता आहे. एकप्रकारे आता जिल्हा परिषदेवर भगवे वादळ घोंगावण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी प्रशासनाच्या वरचढ ठरण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार आहे.