शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

११८० किलोमीटरच्या रस्ते दुरुस्तीसाठी ५६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:48 IST

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांचा मुहूर्त निघाला आहे. जिल्ह्यात एक हजार १८० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी दोन वर्षाकरिता ५६ कोटी रुपये लागणार आहेत.

ठळक मुद्देद्वि-वार्षिक पॅटर्न : यवतमाळात दुसºयांदा निविदा, कंत्राटदारांचा बहिष्कार संपण्याची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांचा मुहूर्त निघाला आहे. जिल्ह्यात एक हजार १८० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी दोन वर्षाकरिता ५६ कोटी रुपये लागणार आहेत.यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत वार्षिक देखभाल दुरुस्ती केली जात होती. परंतु यावर्षीपासून हा पॅटर्न बदलविण्यात आला आहे. आता देखभाल दुरुस्तीचे थेट दोन वर्षांसाठी कंत्राट दिले जात आहेत. हा नवा प्रयोग बांधकाम खात्याने यंदापासून हाती घेतला. राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या देखभाल दुरुस्तीसाठी बांधकाम खात्याने द्वि-वार्षिक निविदा जारी केल्या आहेत. त्याचे बजेट ५६ कोटी रुपयांचे आहे. त्यातून एक हजार १८० किलोमीटरचे रस्ते कव्हर होणार आहे. त्यातही सर्वाधिक देखभाल दुरुस्ती ही पुसद व पांढरकवडा विभागातील रस्त्यांची करावी लागणार आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याने ५६ कोटी रुपयांच्या द्वि-वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या निविदा यापूर्वीच जारी केल्या. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कारण कंत्राटदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामांवर बहिष्कार टाकला आहे. तो अद्यापही कायम आहे. त्यामुळे बांधकाम खात्याने आता दुसºयांदा निविदा जारी केल्या आहेत. त्याला कंत्राटदारांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरते.कंत्राटदारांचा सुरू असलेला बहिष्कार व संप मिटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. जणू रोजच बैठका होत आहे. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. मात्र बांधकाम विभागाला आता संप मिटण्याची आशा आहे. कंत्राटदारांच्या बहुतांश मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. या मागण्या मंजुरीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे लवकरच कंत्राटदारांचा बहिष्कार संपण्याची अपेक्षा असल्याचे बांधकाम खात्यातून सांगण्यात आले. अभियंत्यांनासुध्दा संप मिटण्याची, निविदांना प्रतिसाद मिळण्याची व कामकाज रूळावर येण्याची प्रतीक्षा आले.यवतमाळ-वर्धासाठी १०४३ कोटीकेंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात वर्धा जिल्ह्यात चार हजार ६९८ कोटींच्या कामांचे पॅकेज मंजूर केले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्याशी जोडणाºया दोन कामांचा समावेश आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्टÑीय महामार्ग क्र. ३६१ वरील यवतमाळ ते वर्धा या ६५ किलोमीटरच्या चौपदरीकरणासाठी एक हजार ४३ कोटी रुपये पॅकेजमधून मंजूर झाले आहेत. या मार्गात तीन मोठे व ३० लहान पूल राहणार आहे. याशिवाय वडनेर ते राळेगाव या २७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी २१० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.