शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

५२ कृषी सहायकांचा सव्वा कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:47 IST

कृषी खात्यामार्फत शेतकºयांसाठी राबविल्या जाणाºया कृषी साहित्याच्या योजनांमध्ये शेतकºयांकडून दहा टक्के वाटा म्हणून (शेतकरी हिस्सा) रक्कम गोळा करण्यात आली.

ठळक मुद्देशेतकरी लाभाच्या योजना : आता थेट फौजदारीची तयारी

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृषी खात्यामार्फत शेतकºयांसाठी राबविल्या जाणाºया कृषी साहित्याच्या योजनांमध्ये शेतकºयांकडून दहा टक्के वाटा म्हणून (शेतकरी हिस्सा) रक्कम गोळा करण्यात आली. परंतु ती पुरवठादार महामंडळाकडे न भरता परस्पर हडप केली गेली. ही रक्कम एक कोटी २९ लाख रुपये एवढी प्रचंड असून यातील ५२ कृषी सहायक आता फौजदारीच्या रडारवर आहेत.कृषी विभागामार्फत शेतकºयांसाठी अनुदानावर योजना राबविल्या जातात. डिझेल इंजीन, इलेक्ट्रीक मोटार, स्प्रेअर, पाईप अशा प्रकारचे साहित्य शेतकºयांना दिले जाते. त्यासाठी शेतकºयांना दहा टक्के रक्कम स्वत: आधी भरावी लागते. त्यानंतर त्यांना ९० टक्के अनुदानावर साहित्य दिले जाते. या साहित्याचा पुरवठा महाराष्टÑ कृषी उद्योग विकास महामंडळासह (एमएआयडीसी) अन्य संस्थांमार्फत केला जातो. कृषी सहायक शेतकºयांकडील या दहा टक्के हिश्याची रक्कम गोळा करतात. ती त्यांनी ‘एमएआयडीसी’कडे तातडीने भरणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात कृषी सहायक ही रक्कम लगेच भरत नाही. शिवाय वस्तूंचे परस्पर वितरण केले जाते. गेल्या काही वर्षात शेतकरी हिश्याच्या रकमेचा मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ५२ कृषी सहायकांकडे एक कोटी २९ लाखांची रक्कम थकीत आहे. त्यातील सर्वाधिक २३ लाखांची रक्कम ही एकट्या दिग्रस तालुक्यातील केवळ तीन कृषी सहायकांकडे आहे. तर बाभूळगाव तालुक्यातील २४ कृषी सहायकांकडे १३ लाख रुपये थकीत आहे. नेर तालुक्यातील पाच सहायकांकडे १९ लाख थकीत आहेत.‘एमएआयडीसी’कडून या रकमेच्या वसुलीसाठी कृषी अधिकारी व जिल्हा प्रशासनामार्फत वारंवार प्रयत्न झाले. परंतु परिणाम झाला नाही. उलट शासकीय रकमेचा अपहार करुनही कृषी सहायक मंडळी मुजोर झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आता या सर्व ५२ कृषी सहायकांवर एक कोटी २९ लाखांच्या रकमेसाठी थेट संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्याची तयारी ‘एमएआयडीसी’ने चालविली आहे. त्यासाठी मंजुरी मिळाल्याचेही सांगितले जाते. अनेक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सन २००९-१० पासून कृषी साहित्याचे वाटपही झाले नसल्याची माहिती आहे. भांडारगृहात अनेक साहित्य जैसे थे पडून आहे.