शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भटक्यांच्या पालातील खड्ड्यात ५१ मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:07 IST

भटक्यांच्या पालात खड्ड्यात पुरुन ठेवलेले ५१ महागडे मोबाईल आढळण्याची खळबळजनक घटना महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथे रविवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देहिवरा संगमचा प्रकार : बाजारातील चोरीने बिंग फुटले

ऑनलाईन लोकमतमहागाव/हिवरासंगम : भटक्यांच्या पालात खड्ड्यात पुरुन ठेवलेले ५१ महागडे मोबाईल आढळण्याची खळबळजनक घटना महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. गुंज येथील बाजारात मोबाईल चोरट्याला नागरिकांनी पकडल्यानंतर मोबाईल चोरीचे हे रॅकेटच पोलिसांच्या हाती लागले. महागाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.महागाव तालुक्यात गत काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. गुंज येथे शनिवारी असलेल्या बाजारात नागरिकांनी एका मोबाईल चोरट्याला रंगेहात पकडले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यावरून पोलिसांनी रविवारी पहाटे हिवरासंगम येथील गावाबाहेर असलेल्या पालावर धाड टाकली. त्या ठिकाणी पालात खड्डा खोदून ५१ मोबाईल लपवून ठेवल्याचे आढळून आले. पालातील खड्ड्यातून महागडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. दरम्यान या प्रकरणी बाबू उर्फ बाबय्या सुरगुडू (२८), एम. रामलू लक्ष्मणय्या (३६), एम. सामलू लक्ष्मणय्या (३०) सर्व रा. हैदराबाद यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या पालातून मोबाईल हस्तगत केले.महागाव शहरासह तालुक्यात अनेक महागडे मोबाईल गत काही दिवसांपासून चोरीला जात होते. अनेक पोलिसांचेही मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहे. आता या टोळीचा छडा नागरिकांच्या सतर्कतेनेच लागला आहे. आंध्रप्रदेशातील असलेल्या या मोबाईल चोरट्यांच्या टोळीत आणखी सदस्यांचा समावेश असावा असा कयास आहे.जिल्ह्यात दररोज मोबाईलच्या चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. आठवडी बाजारासह गर्दीच्या ठिकाणी महागडे मोबाईल अलगद लंपास केले जात आहे. परंतु चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. दरम्यान महागाव पोलिसांनी ही टोळी पकडल्याने मोबाईल चोरट्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.भीक मागण्याच्या नावाखाली चोरीमोबाईल चोरट्यांच्या टोळीत काही अल्पवयीन मुलेही आहेत. भीक मागण्याच्या नावाखाली गर्दीत शिरुन महागडे मोबाईल लंपास करीत होते. चोरलेले मोबाईल ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणच्या पालात खड्डा करून पुरले जात होते. त्यानंतर या मोबाईलची विल्हेवाट लावली जात होती.