शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात ५०९० शेततळे पूर्ण; राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 14:22 IST

राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्त्वाकांक्षी योजनेत यवतमाळ जिल्ह्यात ५०९० शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. लक्षांकापेक्षा अधिक शेततळे निर्माण करून यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

ठळक मुद्देकोरडवाहू क्षेत्रात संरक्षित सिंचनात वाढ

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्त्वाकांक्षी योजनेत यवतमाळ जिल्ह्यात ५०९० शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. लक्षांकापेक्षा अधिक शेततळे निर्माण करून यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या शेततळ्यांमुळे संरक्षित सिंचनात वाढ होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.

राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याने सिंचन क्रांतीकडे वाटचाल सुरू केली आहे.यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा. सिंचनाचे सात ते आठ टक्के जेमतेम क्षेत्र. उर्वरित ९२ टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून. त्यातही अलिकडच्या काळात पावसाचे प्रमाण कमी आणि अनिश्चित झाले. त्याचा परिणाम विपरित उत्पादनावर होऊ लागला. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढले तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, हेच हेरून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी मागेल त्याला शेततळे योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. शासनाने ७ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयाने ही योजना जिल्ह्यात सुरू केली. २४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत जिल्ह्यात केवळ १६४९ शेततळे पूर्ण झाले. मात्र जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्ह्याचे सूत्र हाती घेतले आणि अवघ्या ९० दिवसात ३०१६ शेततळे पूर्ण केले. विशेष म्हणजे, जिल्ह्याला ४५०० शेततळ्यांचा लक्षांक असताना ५०९० शेततळे पूर्ण झाले.ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध उपाय योजले. महसूल आणि कृषी विभागात समन्वय निर्माण करून शेततळ्यासाठी नियोजन करण्यात आले. प्रसार माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करण्यात आली. लोक प्रतिनिधींचा सहभागही वाढविला. समूह पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले. एवढेच नाही तर दररोज सायंकाळी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप व ई-मेलद्वारे योजनेची प्रगती आणि अहवालाचे संकलन करण्यात आले. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच जिल्ह्यात शेतशिवारात शेततळे निर्माण झाले. प्रशासकीय अधिकाऱ्याने मनावर घेतले तर योजना कशी यशस्वी होते, याचे हे उदाहरण ठरले आहे. विशेष म्हणजे, अल्पावधीत लक्षांक पूर्ण करून शेततळे निर्मितीत यवतमाळ जिल्ह्यात राज्यात अव्वल ठरला आहे.भूजल स्त्रोत वाढणारजिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या शेततळ्यांमुळे भूजल स्त्रोत वाढण्यास मदत होणार आहे. शेततळ्यांमुळे संरक्षित सिंचनाद्वारे जवळपास ५०९० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून रबीच्या क्षेत्रातही वाढ होणार आहे. भविष्यात पडलेला पाऊस जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरविण्यासाठी ही योजना वरदान ठरणार आहे.शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी शेततळे ही योजना वरदान आहे. यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर सर्वप्रथम सिंचन क्षेत्र वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. शेततळे योजना प्रभावीपणे राबविण्यात जिल्ह्यात राबविण्यात आली. प्रत्येक विभागनिहाय बैठक घेऊन शेतकऱ्यांना शेततळ्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. सर्वांच्या सहकार्यामुळे लक्षांकापेक्षा अधिक शेततळे निर्माण झाले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी निश्चितच होणार आहे.- डॉ.राजेश देशमुखजिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती