शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीज केंद्र तोडफोडप्रकरणी ५०० जणांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: August 29, 2014 00:06 IST

तालुक्यातील मार्डी येथील वीज उपकेंद्राच्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी तब्बल ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने मार्डी परिसरातील गावकरी वीज

मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील वीज उपकेंद्राच्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी तब्बल ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने मार्डी परिसरातील गावकरी वीज वितरण केंद्रावर मंगळवारी रात्री धडकले होते. त्याठिकाणी तोडफोड करण्यात आली होती.मार्डी येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र आहे. येथून १३ गावांना वीज पुरवठा केला जातो. मात्र ऐन सणासुदीच्या दिवसात भारनियमनाच्या नावाखाली तीन दिवसांपासून वीज पुरवठा बंद होता. त्यामुळे मार्डी परिसरातील हिवरा, मजरा, दांडगाव, डोंगरगाव येथील नागरिक संतप्त झाले. तान्हा पोळ्याच्या दिवशी मंगळवारी रात्री गावकरी वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रावर धडकले. त्याठिकाणी त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच तेथे जमावाने तोडफोड करीत आपला रोष व्यक्त केला. याप्रकरणी मार्डी वीज वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता लक्ष्मण साळुंके यांनी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत गैरकायद्याची मंडळी जमून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. दमदाटी करून साहित्याची तोडफोड करून शासकीय कामात अडथळा आणल्याचे म्हटले. या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी तब्बल ५०० जणांविरुद्ध विद्युत कायदा २००० चे कलम ३ तसेच भादंवि १४३, ३५३, ४०७, १३९, १४० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक संबंधित गावाकडे रवाना झाले आहे. वीज वितरणच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (शहर प्रतिनिधी)