शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या एकरात ५० क्ंिवटल तुरीचे पीक

By admin | Updated: May 21, 2017 00:27 IST

राबराब राबूनही शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटल तूर पिकविणे अवघड जाते. नेरमधील एका व्यापाऱ्याने

व्यापाऱ्याची अशीही ‘सधन कास्तकारी’ : तूर घोटाळ्याचा भंडाफोड, फौजदारीचे आदेश रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राबराब राबूनही शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटल तूर पिकविणे अवघड जाते. नेरमधील एका व्यापाऱ्याने मात्र केवळ १८ आर पेऱ्यात चक्क ४९ क्विंटल तूर पिकविल्याचे उघडकीस आले. तूर चोरी लपविण्याचा हा प्रयत्न व्यापाऱ्याच्या अंगलट आला असून सहकार विभागाने फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावर अनेक व्यापाऱ्यांनीही तुरी विकल्याचे स्पष्ट होत आहे. यात तब्बल ४०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली. त्यामुळे तूर विक्रेत्या शेतकऱ्यांच्या दस्तावेजाची छाननी केली जात आहे. या छाननीत नेरमधील एका व्यापाऱ्याला केवळ १८ आर पेऱ्यात चक्क ४९ क्विंटल तूर पिकल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आता जिल्ह्यातील १५ केंद्रांवर चौकशी सुरू झाली आहे. प्रत्येक केंद्रावर सहकार उपनिबंधक आणि सहायकांमार्फत तपासणी होत आहे. ३० कर्मचाऱ्यांचे पथक ही तपासणी करीत आहे. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर आत्तापर्यंत ११ हजार शेतकऱ्यांनी दोन लाख क्विंटल तूर विकल्याची माहिती आहे. यात चार हजारावर शेतकऱ्यांनी २५ क्विंटलपेक्षा जास्त तुरीची विक्री केली. या शेतकऱ्यांच्या दस्तावेजाची छाननी केली जात आहे. त्यांचा सातबारा आणि लागवड क्षेत्र तपासून त्यांची चौकशी केली जाणार आहे. नेर येथील युवा शेतकरी संघर्ष समितीने शासकीय तूर खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांनीच तूर विकल्याची तक्रार केली होती. दारव्हाचे सहाय्यक निबंधक प्रेम राठोड यांनी चौकशी करून जिल्हा उपनिबंधकांना सादर केलेल्या अहवालात या केंद्रावर ३११ शेतकऱ्यांनी तीन हजार ९१३ क्विंटल तूर विकली असून त्यात २० व्यापाऱ्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट केले होते. शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी ठरले उत्तम शेतकरी नेर येथील चौकशीत अनेक धक्कदायक बाबी समोर आल्या. यात एका व्यापाऱ्याने ३० आर जमिनीतून २९ क्ंिवटल, तर दुसऱ्या व्यापाऱ्याने एवढ्याच जमिनीतून ४९ क्विंटल तुरीचे उत्पन्न घेतल्याचे स्पष्ट झाले. तिसऱ्या व्यापाऱ्याने मक्त्याने शेती करून ३२ क्विंटल उत्पन्न घेतले. यामुळे शेतकऱ्यांपेक्षा व्यापारीच उत्तर शेतकरी ठरल्याचे दिसून येत आहे. मात्र आता या प्रकरणी प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवी यांनी सदर व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले. त्यांचा परवाना निलंबित करण्याचे पत्रही दिले.