शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा येथे मुख्याध्यापकाकडून पाच विद्यार्थिनींचा विनयभंग

By admin | Updated: February 12, 2017 00:13 IST

पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींशी मुख्याध्यापकाने केलेला संतापजनक प्रकार शनिवारी पुढे आला.

गुन्हा दाखल : जिल्हा परिषद शाळेला पोलिसांचा गराडा बाभूळगाव : पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींशी मुख्याध्यापकाने केलेला संतापजनक प्रकार शनिवारी पुढे आला. तालुक्याच्या नांदुरा (खु.) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. शाळेला पोलिसांचा गराडा पडला होता. पोलिसांनी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले. मागील काही महिन्यांपासून मुख्याध्यापक आर. बी. तुमाने (४५) याच्याकडून सुरू असलेला घृणास्पद प्रकार चिमुकल्यांनी पालकांना सांगितला. यामुळे संतप्त पालक आणि गावकरी शाळेवर धडकले. या बाबीची माहिती होताच पोलिसांचा ताफा शाळेत धडकला. मुख्याध्यापक तुमाने हे शाळेत पोहोचताच पालक आणि गावकऱ्यांनी त्यांच्यावर आपला रोष व्यक्त करत मारहाण सुरू केली. पोलिसांनी थोडाही विलंब न करता या मुख्याध्यापकाला एका वर्गखोलीत ठेवले. तोपर्यंत आजूबाजूच्या गावातील नागरिकही मिळेल त्या साधनांद्वारे तेथे दाखल होत होते. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून यवतमाळ येथून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, तहसीलदार दिलीप झाडे, बाभूळगावचे ठाणेदार अनिल पाटील, एपीआय किशोर सरोदे, पीएसआय एस.व्ही. पाटोळे, नायब तहसीलदार एम.बी. मेश्राम, सरपंच किरण पंकज कांबळे, माजी सरपंच सचिन महल्ले आदींनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शस्त्रधारी पोलिसांनी मुख्याध्यापकाला खोलीतून बाहेर काढत पोलीस वाहनात कोंबले. मुख्याध्यापक आर. बी. तुमाने याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दंडाधिकाऱ्यांचे आवाहन महिला ग्रामसेविका, महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, महिला पोलीस पाटील यांनी राष्ट्रीय कार्य समजून गावागावांतील शाळांमध्ये जावून विद्यार्थिनींना विश्वासात घेवून त्यांची विचारपूस करावी. त्यामुळे नांदुरा (खु) येथे जो प्रकार घडला, अशा प्रकाराला आळा घालता येईल. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी दिलीप झाडे यांनी केले. (प्रतिनिधी)