शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

फायनान्समधून साडेपाच लाख लंपास

By admin | Updated: August 7, 2015 02:23 IST

फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून लॉकरमधील रोख पाच लाख ६५ हजार ८६० रुपये आणि...

पुसदची घटना : चोरटे श्रीरामच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैदपुसद : फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून लॉकरमधील रोख पाच लाख ६५ हजार ८६० रुपये आणि कर्जाची कागदपत्रे लंपास केल्याची घटना येथील मोतीनगर परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चोरटे या कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. श्रीराम फायनान्स कंपनीचे कार्यालय येथील चांडक कॉम्प्लेक्समध्ये आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आॅफिस उघडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला शटरचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने ही माहिती व्यवस्थापकाला दिली. त्यांनी तत्काळ तेथे धाव घेतली असता कार्यालयातील एका लॉकरमधील काळ्या बॅगमध्ये ठेवलेले पाच लाख ६५ हजार ८६० रुपये लंपास झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. श्रीराम फायनान्स कंपनी शहरात डेली कलेक्शनचे काम करते. दिवसभर गोळा झालेले पैसे एजंट सायंकाळी येथे जमा करतात. रात्री ९ वाजेपर्यंत सदर कार्यालय सुरू असते. बुधवारी नेहमीप्रमाणे वसुलीचे पैसे कार्यालयातील लॉकरमध्ये ठेवले होते. परंतु रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने पैसे लंपास केले. तसेच या बॅगमध्ये असलेले कर्जाचे कागदपत्रही लंपास केल्याचे लक्षात आले. फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक विजय मापारी यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून या कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहे. सदर फुटेज शुक्रवारी पोलिसांना देणार असल्याचे सांगण्यात आले. या चोरीने शहरात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)