शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

चापडोह जंगलातील ४७९५ वृक्षतोडीची चौकशी संशयास्पद

By admin | Updated: February 21, 2016 01:55 IST

यवतमाळ तालुक्यातील चापडोह परिसरात उघडकीस आलेल्या चार हजार ७९५ सागवान वृक्षांच्या तोडीची चौकशी संथगतीने सुरू आहे.

समकक्ष अधिकारी करतोय चौकशी : थुटांची मोजणीच नाही, जप्त माल बेवारस स्थितीत यवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील चापडोह परिसरात उघडकीस आलेल्या चार हजार ७९५ सागवान वृक्षांच्या तोडीची चौकशी संथगतीने सुरू आहे. त्याच्या कार्यपद्धतीमुळे ही चौकशी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चापडोह येथे ही वृक्षतोड उघड झाली. गट क्र. ८३, ८६ व ८७ मध्ये ही तोड झाली आहे. हैदराबादच्या रेड्डी नामक कंत्राटदारासाठी यवतमाळ तालुक्यातील बाळू नामक कंत्राटदाराने ही तोड केली आहे. सदर बाळूचे नाव यापूर्वी पारवा वनपरिक्षेत्रातील वृक्षतोडीमध्येही पुढे आले होते. चापडोहमध्ये सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या सागवानाची तोड झाली. त्यातील दहा ट्रक सागवान हैदराबादला रवानाही झाले. या सागवानावर बोगस हॅमर मारले गेले आहे. त्याची चौकशी सहायक वनसंरक्षक गौपाल यांच्याकडे देण्यात आली. मात्र समकक्ष अधिकाऱ्याचा कारनामा असताना त्याच दर्जाच्या अधिकाऱ्याकडे चौकशी दिली कशी हा प्रश्नच आहे. थुटांची मोजणी न करता ही चौकशी केली जात आहे. गट नं. ८३ पासून या चौकशीचा प्रारंभ होणे अपेक्षित असताना ती गट नं. ८६ पासून सुरू केली गेली आहे. त्यामुळे या चौकशीवर संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी २०० घनमीटर सागवान पडून आहे. मात्र त्यावर कुणाचीही देखरेख नाही. त्यामुळे त्यातील सागवान रात्रीला रफादफा केले जाण्याची शक्यता आहे. चौकशीचा गोंधळ घालण्यामागे अतिरिक्त तोड दिसू नये हा छुपा उद्देश असल्याचे सांगितले जाते. मालकीच्या नावाखाली संरक्षित जंगलातील सागवान तोडले गेले आहे. विशेष असे चापडोह परिसरात मालकीच्या वृक्षतोडीलाही थेट केंद्र शासनाची परवानगी लागते. मात्र स्थानिक परवानगीच्या नावाखाली सर्रास वृक्षतोड केली गेली. या वृक्षतोडीत अनियमितता झाल्याचे अधिकारी मौखिकरीत्या कबूल करतात. आठ एकर शेतातील नाल्यासहीत सर्वच सागवान तोडले गेले आहे. अधिक धान्य पिकविण्यासाठी ही जमीन दिली गेली होती. भोगवटदार -२ ची ही जमीन गेल्या दहा वर्षांपासून पडिक आहे. नियमानुसार तीन वर्षात ती शासनाने परत घेणे बंधनकारक असताना संबंधित तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते.