शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

चोरीतील ४५ फ्रीज विकणारा साक्षीदार

By admin | Updated: September 29, 2014 23:11 IST

नोकरानेच इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गोदामातील महागड्या ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूची चोरी करून त्याची अल्पकिंमतीत विक्री केली. चोरीतील लाखोंच्या वस्तू खरेदी करणाऱ्या चार जणांना रविवारी

उलाढाल झाल्याची ओरड : प्रतिष्ठानातील चोरीचे प्रकरण यवतमाळ : नोकरानेच इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गोदामातील महागड्या ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूची चोरी करून त्याची अल्पकिंमतीत विक्री केली. चोरीतील लाखोंच्या वस्तू खरेदी करणाऱ्या चार जणांना रविवारी ताब्यात घेण्यात आले. मात्र त्यांच्यावर कारवाई न करता सर्वांनाच साक्षीदार बनविण्यात आले. विशेष असे की, चोरीतील ४५ फ्रीज आपल्या एन्टरप्राईजेसमधून विकणाऱ्या एका व्यापाऱ्यालाही पोलिसांनी साक्षीदार बनवून कळसच गाठल्याचे दिसून येत आहे. शहरातील एका प्रतिष्ठित प्रतिष्ठानामध्ये ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. त्यातूनच त्याची प्रत्येक दिवशी व्यवसायातून लाखोंची उलाढाल होते. नेमक्या याच बाबीचा फायदा घेत काही नोकरांनी गोदामातून या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू टप्याटप्प्याने लंपास केल्या. त्यामध्ये फ्रीज, टीव्ही, एलईडी आदी वस्तूंचा समावेश आहे. ही बाब नुकतीच संबंधित व्यावसायिकाच्या लक्षात आली. त्याने या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली. तसेच संशयित व्यक्तींची माहितीही पोलिसांना दिली. त्यावरून आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांंना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गोदामातून आॅर्डरच्या वस्तूंसोबत लाखोंच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लंपास केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. तसेच माल खरेदी करणाऱ्या चार व्यक्तींची नावेही पोलिसांपुढे उघड केली. त्या चारही जणांना रविवारी दुपारीच शहर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनीही चोरीतील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. वास्तविक चोरीतील मालखरेदी करणाऱ्या व्यक्तींना आरोपी बनविणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता चारही खरेदीदारांना साक्षीदार बनविले. (स्थानिक प्रतिनिधी)