शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

४४ कोटींचा निधी मिळूनही पांढरकवड्यात विकासाच्या नावे बोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

नियोजनाचा अभाव रस्त्यावर गुरांचा मुक्तसंचार नरेश मानकर पांढरकवडा - नगरपरिषदेत नगराध्यक्षासह १९ पैकी १४ सदस्य निवडून देऊन पांढरकवडावासीयांनी प्रहार ...

नियोजनाचा अभाव

रस्त्यावर गुरांचा मुक्तसंचार

नरेश मानकर

पांढरकवडा - नगरपरिषदेत नगराध्यक्षासह १९ पैकी १४ सदस्य निवडून देऊन पांढरकवडावासीयांनी प्रहार जनशक्ती पार्टीवर विश्वास दाखवित एकहाती सत्ता दिली. पालिकेला विकास कामासाठी मागील चार वर्षात ४४ कोटी ६७ लाखांचा घसघशीत निधीही मिळाला. परंतु नियोजनाचा अभाव असल्याने अनेक कामांना मुहूर्तच मिळाला नाही. दुसरीकडे मंजूर असलेली अनेक कामेही रखडलेली असल्याने शहरवासीयांचा मोठा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून येते.

शहरात योग्य नियोजनाअभावी कामांवर खर्च करूनही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत. त्यामुळेच नागरिकांना विविध समस्यांचा आजही सामना करावा लागत आहे. शासनाच्या विविध योजनांअंतर्गत विकास कामांसाठी मिळालेल्या निधीतून विकास कामे करण्यात आली. परंतु विविध भागातील समस्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे कामाचे नियोजन आवश्यक असताना, मूलभूत सोयी-सुविधांऐवजी इतर कामांना प्राधान्य दिले असल्याचे दिसते.

पांढरकवडा शहरासाठी खुनी नदीच्या पाण्याद्वारे पाणीपुरवठा होतो. ही योजना अतिशय जुनी आहे. त्यामुळे अनेकदा पाईपलाईन लिकेज होते. संपूर्ण पाईपलाईन तातडीने बदलणे आवश्यक असताना, हे काम रखडले आहे. हिंदू स्मशानभूमीवरील मोठ्या शेडचे बांधकामही सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात रखडलेलेच आहे. महादेव घाट सौंदर्यीकरणाचे कामही जैसे थे आहे. रस्त्यांची व नाल्यांची कामेही अर्धवट अवस्थेत आहेत. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच फॉगिंग मशीनद्वारे फवारणी केली जाते. परंतु या कामातही सातत्य नाही.

बॉक्स -

अतिक्रमणांची समस्या कायम

शहरातील मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजार परिसर, डीपी रोड, बसवेश्वर चौक ते डायमंड चौक, शिबला पॉईंट्सह अनेक ठिकाणी अतिक्रमणांची समस्या कायम आहे. शहरातील रस्ते मोठे असूनही व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अरुंद बनले आहेत. शहराच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा भाजीपाला, फळ विक्रेते व मिठाईवाल्यांची दुकाने लागतात. त्यातच गुरांचा ठिय्याही रस्त्यावरच असतो. त्यामुळे वाहतूक ठप्प होते.

बॉक्स -

रस्त्यांची दयनीय अवस्था

पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वाहतुकीचा रस्ता असलेल्या वाय पॉईंट ते बसवेश्वर चौकादरम्यान, बिरसा मुंडा चौक ते स्टेट बँक रोड, तसेच वसंतराव नाईक चौक ते विश्रामगृह रोड ते बिर्सा मुंडा चौकदरम्यान मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे.

बॉक्स -

नवीन वसाहतींत घाणीचे साम्राज्य

शहरात नवीन झालेल्या काही वसाहतींमध्ये नाल्यांची कामे न झाल्यामुळे सांडपाणी मोकळ्या जागेत व रस्त्यावर येत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. नीलकंठनगरमध्ये नाल्यांचे बांधकाम न केल्याने सांडपाणी मोकळ्या जागेत जमा होत आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ च्या जुन्या पुलावरून जाणाऱ्या रस्त्यावरही घाणीचे साम्राज्य पसरले आहे.