शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

४३ डिजिटल शाळांना मिळणार सोलर सिस्टीम

By admin | Updated: July 16, 2016 02:37 IST

दर्जेदार शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा भराभर डिजिटल होत आहेत.

६४ लाख ५० हजारांचा निधी : पांढरकवडा, पुसद, आर्णी, घाटंजीसह नऊ तालुक्यांना लाभ अविनाश साबापुरे यवतमाळ दर्जेदार शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा भराभर डिजिटल होत आहेत. मात्र या डिजिटल प्रगतीला ग्रामीण भागातील अनियमित वीज पुरवठ्याचा अडथळा निर्माण होत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी आता डिजिटल शाळांना सोलर सिस्टीम पुरविली जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव्या युगाशी ताळमेळ साधत शैक्षणिक विकास करता यावा, यासाठी डिजिटल शाळांची गरज निर्माण झाली आहे. शिक्षकांनी लोकवर्गणी गोळा करून शाळा डिजिटल केल्या आहे. मात्र खेडेगावात वीजपुरवठाच सुरळीत नसल्याने डिजिटल अध्यापन करणे अशक्य होत आहे. डिजिटल क्लास रूममधील संगणक, प्रोजक्टर आदी बाबी अव्याहत सुरू राहणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांची ही गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने सोलर सिस्टीम (सौरऊर्जा पॅनल) देण्याचा निर्णय घेतला. मानव विकास मिशनअंतर्गत या प्रकल्पासाठी ६४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मानव विकास मिशनअंतर्गत येणाऱ्या पुसद, झरीजामणी, आर्णी, मारेगाव, पांढरकवडा, कळंब, घाटंजी, उमरखेड आणि महागाव या नऊ तालुक्यांमधील डिजिटल शाळांमध्ये हे सोलर पॅनल बसवून देण्यात येणार आहे. या संदर्भात औरंगाबाद येथील मानव विकास आयुक्तालयाशी संपर्क साधला असता, निधीला मंजुरी मिळाली असून पुढील कार्यवाही जिल्हाधिकारी तथा जिल्हा मानव विकास समितीचे अध्यक्ष यांनी करावयाची असल्याचे सांगण्यात आले. एकमेव यवतमाळ जिल्ह्याची निवड मानव विकास मिशनअंतर्गत राज्यातील मागास आणि दुर्गम अशा १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र शाळांना सोलर पॅनल पुरविण्याच्या प्रकल्पासाठी एकमेव यवतमाळ जिल्ह्याची निवड करण्यात आल्याचे औरंगाबाद आयुक्तालयातून स्पष्ट करण्यात आले. शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी उमरखेड आणि मारेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी संवाद साधला होता. त्यावेळी दुर्गम भागातील शाळांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर या शाळांना सोलर सिस्टीम पुरविण्यात येईल, असे सूतोवाच त्यांनी केले होते. जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शाळांना सोलर सुविधा उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे.