शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४३ बॅग सोयाबीन उगवलेच नाही

By admin | Updated: August 7, 2014 00:03 IST

एक दोन नव्हे तर तब्बल ४३ बॅग सोयाबीन बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाही. ही घटना तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे घडली. अखेर संबंधित शेतकऱ्याने या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केली.

घाटंजी : एक दोन नव्हे तर तब्बल ४३ बॅग सोयाबीन बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाही. ही घटना तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे घडली. अखेर संबंधित शेतकऱ्याने या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यावरून कृषी अधीक्षकांनी या शेताला भेट देऊन पाहणी केली. अजय राजाराम येल्टीवार असे बियाण्यांची उगवण न झाल्याने व्यथीत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे शेती आहे. पावसाच्या लहरीपणाने यंदा दुबार तिबार पेरणी करावी लागली. त्यातच पुन्हा महागडे बियाणे खरेदी करून शेतकरी येल्टीवार यांनी शेतात पेरणी केली. त्यानंतर पाऊसही चांगला आला. मात्र ४३ पैकी एकही बॅग सोयाबीन बियाणे उगवले नाही. या संदर्भात त्यांनी सुरुवातीला सारस कंपनीच्या विक्रेत्याकडे पाठपुरावा केला. मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी या प्रकरणी येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. त्यांनीही या तक्रारीवर कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर सदर शेतकऱ्याला घाटंजी येथे गतीमान कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा होणार असल्याची माहिती मिळाली. तसेच या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा कृषी अधीक्षक काशिनाथ गायकवाड उपस्थित राहणार असल्याचे कळले. त्यावरून सदर शेतकऱ्याने प्रशिक्षण कार्यशाळेत हजेरी लावली. तसेच याबाबत सामाजिक न्यायमंत्री मोघे आणि कृषी अधीक्षक गायकवाड यांना तक्रार देऊन पाहणी करण्याची विनंती केली. त्यावरून कृषी अधीक्षक गायकवाड यांनी शेतकऱ्यांसमवेत तेथे जावून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार, डॉ.पार्लावार, डॉ.प्रशांत नाईक उपस्थित होते. सदर शेतकऱ्याला न्याय मिळतो की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)