शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत पहिल्या टप्प्यात ४१ बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:06 IST

जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात ४१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता बदलीचा दुसरा टप्पा १४ आणि १५ मे रोजी राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देसमुपदेशन : १४ व १५ मे रोजी जत्रा भरणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात ४१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता बदलीचा दुसरा टप्पा १४ आणि १५ मे रोजी राबविला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे वेळापत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी आखून दिले. त्यानुसार पहिल्या टप्पयात ९ मे रोजी पाणीपुरवठा, सिंचन, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, वित्त आणि महिला व बालकल्याण विभागातील तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या. यात बांधकाम आणि पशुसंवर्धन विभागातील प्रत्येकी १२ कर्मचाऱ्यांची बदली झाली. याशिवाय महिला व बालकल्याण विभागातील पाच, कृषीमधील तीन आणि पाणीपुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली. सिंचन विभागातील मात्र एकाही कर्मचाऱ्याची पहिल्या टप्प्यात बदली झाली नाही.आता दुसऱ्या टप्प्यात १४ मे रोजी सामान्य प्रशासन व पंचायत विभागातील, तर १५ मे रोजी प्राथमिक शिक्षण विभाग व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहे. यात सर्वाधिक उत्सुकता आहे ती शिक्षकांच्या बदल्यांची. कारण गेल्या तीन वर्षांपासून काही ना काही कारणाने या बदल्या रखडल्या होत्या. यावर्षीही काही संघटनांनी राज्य स्तरावर मोर्चा काढून बदलीला विरोध दर्शविला होता. मात्र शासन आणि प्रशासन बदली धोरणावर ठाम आहे. त्यामुळे १५ मे रोजी होणाऱ्या शिक्षक बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.किमान ४००० हजार शिक्षकांच्या बदल्याजिल्ह्यात सात हजार ७६६ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी पाच हजार ३३३ शिक्षक बदलीपात्र ठरले आहेत. या सर्वांच्या १५ मे रोजी समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहे. यात किमान चार हजार ते चार हजार २०० शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक आणि सहायक शिक्षकांचा समावेश असणार आहे. याशिवाय ऊर्दू माध्यमाचे १६९ शिक्षक बदलीपात्र आहेत. त्यांच्याही बदल्या होणार आहेत.

टॅग्स :Transferबदली