शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

३६० गावांच्या जहागिरीचा गणेशोत्सव ४०० वर्षांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:17 IST

‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आता काही गावे स्वीकारू लागली आहेत. मात्र तब्बल ३६० गावांचा मिळून एकच गणपती बसविण्याची परंपरा पारव्याच्या (ता. घाटंजी) जहागिरीने सुरू केली होती.

ठळक मुद्देपारव्यात पुरणाच्या पंगतीची परंपरा : देखण्या मूर्तीच्या निर्मात्याला मिळाली जमीन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आता काही गावे स्वीकारू लागली आहेत. मात्र तब्बल ३६० गावांचा मिळून एकच गणपती बसविण्याची परंपरा पारव्याच्या (ता. घाटंजी) जहागिरीने सुरू केली होती. हजारो लोकांसाठी चक्क पुरणाच्या पोळीची पंगत बसायची. चक्क १० दिवस ही जेवणावळ असे. आता जहागिरी गेली. ३६० गावांमध्ये ३६० पेक्षा अधिक गणपती बसतात. मात्र, जहागिरीच्या वाड्यातला गणेशोत्सव ४०० वर्षानंतरही तेवढ्याच दिमाखात साजरा केला जात आहे.पांढरकवड्यापासून घाटंजीपर्यंत आणि घाटंजीपासून कळंब, राळेगाव तालुक्यांपर्यंतच्या ३६० गावांना कवेत घेणारा परिसर म्हणजे एकेकाळी पारवेकर घराण्याच्या जहागिरीचा परिसर होता. पारवा (ता. घाटंजी) येथील बाबासाहेब देशमुख पारवेकर यांचा दिमाखदार वाडा म्हणजे या जहागिरीची राजधानीच. ३६० गावांतील जल, स्थल, पाषाण, जंगल अशा प्रत्येक गोष्टीवर अधिराज्य गाजविणारा हा मालकाचा वाडा गणेशोत्सवात मात्र प्रत्येक गावकºयाचे घर बनून जायचा. वाड्यातल्या गणपतीची मिरवणूक, वाड्यातल्या गणपतीची रोजची आरती आणि विसर्जनाचा प्रसंग म्हणजे ३६० गावांच्या एकोप्याचे दर्शन घडविणारा क्षण.गणपतीसाठी वाड्यात भव्य असा कोनाडा तयार करण्यात आला आहे. पूर्ण चांदीत बनविलेला हा नक्षीदार कोनाडा एखाद्या राजाच्या सिंहासनापेक्षाही मोठा आहे. गणेशाची भव्य मूर्ती बसल्यावर कोनाडा अधिक खुलतो. कोनाड्याच्या बाहेर देखण्या रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती ठेवण्याची परंपरा आजही कायम आहे. वाड्यातला गणपती तयार करणारा मूर्तिकार वर्षानुवर्षे कायम आहे, हे आणखी एक वैशिष्ट्य. पारव्यातील दिगंबर पंचाळ यांच्याकडेच हे काम असायचे. या कामासाठी त्यांना पैशाच्या रुपात कधीही मोबदला दिला गेला नाही. माजी खासदार आबासाहेब पारवेकर यांच्या काळात त्यांना जहागिरीतील ३७ एकर जमीन देण्यात आली.बाबासाहेब, आबासाहेब यांच्यापासून सुरू असलेली वाड्यातल्या गणेशोत्सवाची परंपरा आज माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या काळातही सुरू आहे. यंदाही वाड्यावर अण्णासाहेब पारवेकर, दत्तात्रय पारवेकर, डॉ. चंद्रहास पारवेकर, सचिन पारवेकर, योगेश पारवेकर, सुहास पारवेकर यांच्या देखरेखीत दिमाखदार सोहळा सुरू आहे.