शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार मेट्रिक टन खतसाठा

By admin | Updated: May 21, 2017 00:29 IST

जिल्ह्यात गेल्यावर्षीचेच तब्बल ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे.

गरज केवळ पावणे दोन लाखाची : जिल्ह्यातून खत टंचाई होणार हद्दपार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात गेल्यावर्षीचेच तब्बल ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी खत टंचाईची शक्यता दुरावली आहे. जिल्ह्याला खरीप हंगामासाठी एक लाख ७३ हजार ६०० मेट्रिक टन खताची गरज आहे. त्यात ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी खत टंचाई हद्दपार होणार आहे. खरिपासाठी जिल्ह्याला ७२ हजार ३०० मेट्रिक टन युरिया, १३ हजार २०० मेट्रिक टन एमओपी, २८ हजार मेट्रिक टन एसएसपी, १३ हजार ६०० मेट्रिक टन डीएपी, तर ४६ हजार ५०० मेट्रिक टन संयुक्त खत मंजूर झाले आहे. हे खत जिल्ह्यात येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात खत टंचाई जाणवण्याची शक्यता दुरावली आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १३ लाख ५१ हजार हेक्टर आहे. त्यापैकी खरिपात नऊ लाख २० हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने बियाणे, खत आणि लावगडीचे नियोजन केले जात आहे. मात्र शेतकऱ्यांची सर्व भीस्त मृगावर अवलंबून राहणार आहे. कारण जिल्ह्यात केवळ १७ टक्केच शेती ओलिताखाली आहे. उर्वरित ८३ टक्के शेती अद्याप निसर्गावर अवलंबून आहे. विहिरी, बोअरव्दारे ५० हजार हेक्टरचे सिंचन जिल्ह्यातील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा तोकड्या आहेत. कोणताही प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओलीत करीत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ओलितासाठी शेतात विहीर, बोअर खोदली. या विहिरी आणि बोअरव्दारे ४९ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. विविध प्रकल्पांच्या कालव्यांव्दारे प्रत्यक्षात केवळ २४ हजार ५०० हेक्टर शेतीच ओलिताखाली येऊ शकली आहे. चार लाख हेक्टवर कापूस यावर्षीच्या खरिपात जवळपास चार लाख पाच हजार हेक्टरवर कपाशी, तर दोन लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे. बीटी कपाशी बियाण्याची तब्बल २१ लाख ५० हजार पॉकिटे, तर सोयाबीनचे एक लाख १६ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. महाबिजचे सोयाबीनचे १८ हजार क्विंटल बियाणे तूर्तास उपलब्ध आहे.