शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

४० गावात विजेचा लपंडाव

By admin | Updated: May 15, 2016 01:59 IST

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. तालुक्यातील तब्बल ४० गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे.

नागरिक त्रस्त : साखरा, ब्राह्मणगाव परिसरात आठ दिवसांपासून समस्याउमरखेड : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. तालुक्यातील तब्बल ४० गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरणचे कर्मचारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यातील साखरा व ब्राह्मणगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावर जवळपास ४० गावांची जबाबदारी आहे. मात्र या चाळीसही गावात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या विरोधात तालुक्यात रोष निर्माण झाला आहे. ब्राह्मणगाव व साखरा या दोन ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी कोपरा, मानकेश्वर, सिंदगी, परजना, हरदडा, सोईट या गावांना विद्युत पुरवठा केला जातो. वीज पुरवठ्यावर अवलंबून असलेले छोट्या उद्योगांना महावितरण कंपनीमुळे मोठा फटका बसला आहे. घरगुती वापरातील विजेची उपकरणे विजेच्या लपंडावामुळे निरूपयोगी ठरत आहे. आधीच या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. त्यात विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे कसेबसे उपलब्ध होणारे पाणीही आता मिळेनासे झाले आहे. सध्या चालू असलेल्या प्रचंड तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे अनेकांना उष्माघाताचा फटका बसत आहे. वीज खंडित राहिल्यामुळे त्याचा परिणाम लघुउद्योग, गिरणी, महासेवा केंद्र यांच्यावर होत आहे. गावातील पाणीपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईत नागरिकांचा जीव पाण्यासाठी कासावीस झाला आहे. व्यापारी वर्गात वीज वितरण कंपनीविरूद्ध रोष निर्माण झाला आहे. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, बालके, वृद्ध, तरुण, महिला अशा सगळ्यांचेच जगणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळेस हमखास वीजपुरवठा खंडित होत असल्याने कमालीच्या उष्णतामानामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. मे महिना असल्यामुळे सूर्य आग ओकत आहे. आधीच निसर्गाचा प्रकोप सुरू असून त्यात वीजही नसल्याने गर्मीमुळे जगणे मुश्कील झाले आहे. रात्री-अपरात्री जाणाऱ्या विजेमुळे वीज वितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन ब्राह्मणगाववासीयांचे हाल थांबवावे, अशी मागणी करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)छोटे व्यवसाय मोडकळीसतालुक्यातील तब्बल ४० गावांना अनियमित वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे या गावांमधील छोटे व्यवसाय प्रभावित झाले आहे. पीठ गिरण्या बंद पडल्या आहेत. इस्त्री व्यवसाय कोळशाविना ठप्प पडला आहे. झेरॉक्सची दुकाने तर व्यावसायिकांनी काही दिवसांपुरती बंद ठेवणेच पसंत केले आहे. वारंवार खंडित होणाऱ्या आणि अनपेक्षितपणे येणाऱ्या विजेमुळे वीज उपकरणे निकामी होत आहे. त्याचा फटका छोट्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.