शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

वर्षभरात चार हजार परवाने रद्द

By admin | Updated: September 7, 2015 02:26 IST

महाराष्ट्र शासनाच्या वजनमापे नियंत्रकांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील वजनमापे परवानाधारक विक्रेते व दुरुस्तक संतप्त झाले आहे.

वजनमापे नियंत्रकांची मनमानी : न्यायालयाच्या निकालानंतर काढले परिपत्रकयवतमाळ : महाराष्ट्र शासनाच्या वजनमापे नियंत्रकांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील वजनमापे परवानाधारक विक्रेते व दुरुस्तक संतप्त झाले आहे. वर्षभराच्या कालावधीतच राज्यातील चार हजार परवाने धडाधड रद्द करण्यात आले. त्यामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. त्यांनी अन्यायाविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत वैध मापनशास्त्र यंत्रणा मोडते. वैधमापनशास्त्र (वजनमापे) यंत्रणेत ४ आॅक्टोबर २०१४ पासून संजय पांडे हे नियंत्रक पदावर रुजू झाले आहे. तेव्हापासूनच वजनमापे परवानाधारकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. पांडे यांनी केंद्र शासन आणि राज्य सरकारने बनविलेले कायदे धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरू केला आहे. स्वत:चेच नियम परिपत्रकाच्या स्वरूपात बनवून अंमलात आणणे सुरू केले आहे. त्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल दिल्यानंतरही पांडे मनमानीपणे परिपत्रके काढतच आहे. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या मनमानी कारभाराने राज्यातील सुरळीत सुरू असलेले वैधमापनशास्त्र परवानाधारकांचे काम खोळंबून पडले आहे. अनेक परवानाधारकांवर बेकारी ओढवल्याचेही म्हटले आहे.नियंत्रक संजय पांडे यांच्याकडून परवानाधारकावर जाचक अटी लादल्या जात आहे. त्यामुळे दुरुस्तक व वैधमापन विक्रेते यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांच्याशी निगडित व्यापारी व दुकानदारांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वजनमापे परवानाधारकांच्या व्यथा शासनाकडे मांडाव्या, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना जिल्हा वजनमापे परवानाधारक संघटनेचे सचिन बुटले, विनय निळे, नीलेश हरसूलकर, आर.डी. क्षीरसागर, बबन पालवे, भगवान काळे, माया देशमुख, नितीन देठे, राजेश बदे, अतुल सोनकुसरे, गणेश चव्हाण, पवन बोबडे, गुणवंत धाये, अवधुत शिंदे, शंकर हरणे, विलास शिंदे, रूपेश क्षीरसागर, धनंजय मानकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)