शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात 4 हजार 287 मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

१ जानेवारी ते ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे ४ हजार २८७ व्यवहार झाले आहेत. या व्यवहाराकरिता कोट्यवधी रुपयांचा शुल्क ग्राहकांना लागणार होता. मात्र राज्य शासनाने ३ टक्के सूट दिल्यामुळे खरेदी देणारा आणि घेणारा दोघांनाही मोठा दिलासा मिळाला. ही उलाढाल करण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला हजार ते लाख रुपयाचा भुर्दंड पडणार होता. हा भुर्दंड शासनाच्या नियमामुळे वाचला. त्याकरिता ३१ डिसेंबर ही मुदत देण्यात आली होती.

ठळक मुद्देपुढील चार महिने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ३ टक्के सवलत मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. यामुळे राज्य शासनाने खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क ३ टक्क्याने कमी केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत त्याकरिता सूट देण्यात आली होती. यामुळे मोठ्या उद्योजकांसह ठेकेदार, घर व्यावसायिक यांनी खरेदी-विक्री कार्यालयात मोठी गर्दी केली होती. १ जानेवारी ते ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे ४ हजार २८७ व्यवहार झाले आहेत. या व्यवहाराकरिता कोट्यवधी रुपयांचा शुल्क ग्राहकांना लागणार होता. मात्र राज्य शासनाने ३ टक्के सूट दिल्यामुळे खरेदी देणारा आणि घेणारा दोघांनाही मोठा दिलासा मिळाला. ही उलाढाल करण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला हजार ते लाख रुपयाचा भुर्दंड पडणार होता. हा भुर्दंड शासनाच्या नियमामुळे वाचला. त्याकरिता ३१ डिसेंबर ही मुदत देण्यात आली होती. आता ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना पुढील चार महिने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सूट मिळणार आहे. शासनाच्या या नियमामुळे घर, स्थावर मालमत्ता, शेती यासह विविध विषयाच्या खरेदी-विक्री व्यवहाराकरिता लाभार्थ्यांना लाभ मिळाला. यातून कोट्यवधी रुपयाचे मुद्रांक शासनाच्या तिजोरीत जमा झाले. या व्यवहाराकरिता मोजकेच दिवस असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.

जिल्ह्यात खरेदी-विक्रीचा व्यवहार वाढलाजिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अधिक मुद्रांकाची विक्री झाली. राज्य शासनाने खरेदी-विक्री करावर ३ टक्क्यांची सूट दिली. यामुळे या व्यवहारात वाढ नोंदविण्यात आली. याशिवाय ग्रामपंचायत निवडणुका आणि इतर कारणांमुळे मुद्रांकाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यामुळे शासनाच्या तिजोरीत भर पडणार आहे.     - सीमा काळेजिल्हा कोषागार अधिकारी, यवतमाळ

दहा कोटी नऊ लाखांचा महसूल मिळाला जिल्ह्यात यावर्षी ४ हजार २८७ खरेदी-विक्रीची नोंद करण्यात आली. ३१ डिसेंबरला अंतिम तारीख असल्याने सर्वाधिक गर्दी खरेदी-विक्रीच्या कार्यालयात पाहायला मिळाली. गतवर्षी ९ कोटी ७६ लाख ७२ हजार रुपयांचे स्टॅम्प विक्री झाले होते. यावर्षी १० कोटी ९ लाख ९ हजार ३०० रुपयांचे स्टॅम्प विक्री झाले. गतवर्षीच्या तुलनेत स्टॅम्पची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या स्टॅम्पवर खरेदी-विक्रीच्या व्यवहारासह ग्रामपंचायत निवडणुकीकरिताही शपथपत्र दाखल करण्यासाठी उपयोग करण्यात येतो. यामुळे यावर्षी राज्य शासनाला जादाचा महसूल मिळणार आहे.

कोरोनाच्या नियमांचा विसरखरेदी-विक्री कार्यालयात दस्तऐवज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. अपुरी जागा आणि सर्वांनाच आपले दस्तऐवज लवकर दाखल व्हावेत, अशी इच्छा असल्याने प्रत्येक जण कार्यालयामध्ये दाटीवाटीने दिसत होते. काहींच्या तोंडाला मास्क होते, तर सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी वारंवार सूचना दिल्यानंतरही नागरिक गर्दी करीत होते.

 

टॅग्स :saleविक्री