शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितांच्या छळाचे वर्षभरात ३८१ गुन्हे

By admin | Updated: July 5, 2014 01:33 IST

जिल्ह्यात विवाहितांच्या छळाच्या वर्षाकाठी सुमारे ४०० गुन्हे दाखल होतात.

यवतमाळ : जिल्ह्यात विवाहितांच्या छळाच्या वर्षाकाठी सुमारे ४०० गुन्हे दाखल होतात. विवाहितेने तक्रारीत नोंदविलेल्या व्यक्तींना आरोपी बनविले जाते. परंतु कौटुंबिक कलहाच्या अशा प्रकरणांमध्ये शिक्षेचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळेच खटल्याच्या निकालानंतर महिलांकडून ४९८ (अ) या कलमाचा गैरवापर होत असल्याचा सूर जिल्ह्यात ऐकायला मिळतो. हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर तीव्र चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने चौकशीशिवाय सासरच्यांना अटक करू नका, असे निर्देश पोलिसांना दिले आहे. यानिमित्ताने गावागावात आणि पोलीस दलातसुद्धा महिलांकडून अनेक प्रकरणात ४९८ (अ) (पती व सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक छळ) या कलमाचा गैरवापर केला जात असल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. यानिमित्ताने अशा प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला असता धक्कादायक वास्तव पुढे आले. येथे वर्षभरात छळाचे सुमारे ४०० गुन्हे दाखल होत असल्याचे आढळून आले. जिल्हा पोलीस दलातर्फे उघडण्यात आलेल्या महिला सुरक्षा व समूपदेशन विशेष कक्षामुळे हा आकडा अर्ध्यावर आल्याचे सांगितले जाते. कोणतीही महिला कौेटुंबिक छळाची तक्रार पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यास तिला प्रथम पोलिसांच्या समूपदेशन केंद्रात पाठविले जाते. तेथे दोनही कडील संबंधित व्यक्तींना बोलावून त्यांचा संसार तुटू नये या दृष्टीने मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यातील मतभेद, गैरसमज मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतरही त्यांच्यात तडजोड होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसेल तर अखेर नाईलाज म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रकरण संबंधित पोलीस ठाण्याला पाठविले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)