शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

३२ परीक्षा केंद्रांवर तब्बल ३५ हजारांवर विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:58 IST

अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचा गोंधळ सलग तिसऱ्या पेपरलाही कायम होता. मंगळवारी ३२ केंद्रांवर तब्बल ३५ हजार विद्यार्थी बसविण्यात आले. उपलब्ध वर्गखोल्यांपेक्षाही जादा विद्यार्थी झाल्याने कुणाला प्रयोगशाळेत, तर कुणाला ग्रंथालयात बसून पेपर सोडवावा लागला.

ठळक मुद्देविद्यापीठ परीक्षा : प्रयोगशाळा, ओट्यांवरही बसविले परीक्षार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचा गोंधळ सलग तिसऱ्या पेपरलाही कायम होता. मंगळवारी ३२ केंद्रांवर तब्बल ३५ हजार विद्यार्थी बसविण्यात आले. उपलब्ध वर्गखोल्यांपेक्षाही जादा विद्यार्थी झाल्याने कुणाला प्रयोगशाळेत, तर कुणाला ग्रंथालयात बसून पेपर सोडवावा लागला. काही जणांना तर चक्क महाविद्यालयाच्या ओट्यावरही बसविण्यात आले.महाविद्यालयांतील प्रिंटरच्या अल्पक्षमतेनेही अनेक ठिकाणी तारांबळ उडाली. सततच्या प्रिंट आॅर्डरने मशिन पेटण्याच्या स्थितीत आल्या. मशिन गरम होऊन त्यावर ‘वॉर्मअप्’चा संदेश येत होता. यामुळे प्राध्यापकांना चांगलीच कसरत करावी लागली.बीए अंतिम वर्षाचा इंग्रजी, प्रथम वर्षाचा मराठी, हिंदी, उर्दू आणि संस्कृत हे ‘कम्पलसरी’ विषय, बीकॉम अंतिम वर्षाचा मराठी, हिंदी. बीसीए, एमए द्वितीयचा अर्थशास्त्र, समाजविज्ञान, इंग्रजी, बी फार्म, एम फार्म आणि एलएलबी विषयाचे पेपर मंगळवारी जिल्ह्यातील ३२ केंद्रांवर घेण्यात आले. या केंद्रावर तब्बल ३५ हजार परीक्षार्थी होते. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसल्याने महाविद्यालयात प्रचंड तारांबळ उडाली.विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी वर्गखोल्या अपुºया पडल्या. यामुळे महाविद्यालयातील प्रयोगशाळा कक्ष, ग्रंथालयाचा हॉल, विद्यार्थी अभ्यासगृह, महाविद्यालयातील ओट्यांवरही परीक्षार्थ्यांना बसविण्यात आले. ही परिस्थिती सांभाळताना मंगळवारी काही महाविद्यालयात परीक्षेला १५ ते २० मिनिटांचा विलंब झाला. यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला. शनिवारी जो जागेचा प्रश्न निर्माण झाला, तोच प्रश्न सोमवारी आणि मंगळवारीही कायम होता. यामुळे एका टेबलवर दोन परीक्षार्थी बसवावे लागले.२० मेपर्यंत गर्दीचे पेपरसर्वाधिक विद्यार्थी असणाऱ्या पेपरचे वेळापत्रक २० मेपर्यंतचे आहे. यानंतरही ७ जूनपर्यंत विविध विषयांचे पेपर विद्यापीठाला घ्यायचे आहेत. एकूणच संपूर्ण उन्हाळा महाविद्यालयांसाठी परीक्षासत्र ठरणार आहे. परीक्षा केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने हा गोंधळ उडत असून शनिवारप्रमाणे मंगळवारीही कन्ट्रोलशिटचा घोळ पाहायला मिळाला.

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा