शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

३५ लाखांचे रस्ता सफाई यंत्र

By admin | Updated: April 2, 2016 02:58 IST

संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. हे बघून वेकोलिने उकणी कोळसा खाणीत तब्बल ३५ लाखांचे रस्ता सफाई करणारे मोबाईल यंत्र आणले आहे.

उकणी खाण : वेकोलिचा स्वच्छता अभियानात सहभागवणी : संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. हे बघून वेकोलिने उकणी कोळसा खाणीत तब्बल ३५ लाखांचे रस्ता सफाई करणारे मोबाईल यंत्र आणले आहे. उकणी खाण व कॉलनीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी वेकोलिने ३५ लाख रूपये खर्च करून हे रस्ता स्वच्छ करण्याचे यंत्र आणले आहे. हे यंत्र डांबरी व सिमेंट रस्त्यावर फिरविले तर आपोआप रस्त्याची स्वच्छता करून माती व कोळसा भुकटी यंत्रात ओढून एका ठिकाणी जमा करते. कोळशाच्या भुकटीच्या धुमळीमुळे वणी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणची समस्या वाढत होती. रस्त्याच्या बाजूच्या शेतातील पिकांवर बारीक भुकटी बसत होती. त्यामुळ पिकांची वाढ खुंटण्याचे प्रमाणही वाढत होते.यावर उपाय म्हणून वेकोलिचे महाप्रबंधक जी.एम. गोखले यांनी हे यंत्र थेट पंजाबातील लुधीयाना येथून बोलाविले आहे. हे यंत्र आजपर्यंत केवळ वेकोलित नागपूर जिल्ह्यातील गाडेगाव खाणीत उपलब्ध होते. त्यानंतर ते आता उकणी कोळसा खाणीत, उपलब्ध झाले आहे. या यंत्राचे नाव ‘रोड स्वीपिंग मशीन’ असून ते रस्ता स्वच्छ करून मातीची व कोळशाची भुकटी ओढून एक मोठ्या टँकमध्ये जमा करते. ही टँक यंत्रातच आहे. नंतर ही भुकटी बाहेर फेकली जाते. त्यानंतर रस्त्यावर हे यंत्र पाणीही मारते. या यंत्राला मोठे डीझल इंजिन बसविले आहे. तसेच हवा आत ओढण्याचे कॉम्प्रेशन बसविले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही ‘अ‍ॅटोमॅटिक’ चालते. यंत्रामागे भले मोठे पाईप असून यंत्र जेथे पोहोचू शकत नाही, तेथे पाईपने माती ओढण्याचे काम केले जाते. हे यंत्र रस्त्यावरील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी लाभदायक ठरले आहे. खनिज विकास निधीतून हे यंत्र येथील नगरपरिषदेला उपलब्ध झाले, तर शहरातील धुळीचे प्रदूषणही नक्कीच कमी होऊ शकते. (प्रतिनिधी)