शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

३२ हजार शेतकऱ्यांना पीक विम्यातून डच्चू

By admin | Updated: April 3, 2017 00:18 IST

नैसर्गिक आपत्तीत मदत मिळावी म्हणून जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला.

अडीच कोटींचा लाभ : पाच हजार शेतकरी पात्र यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीत मदत मिळावी म्हणून जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला. मात्र केवळ पाच हजार शेतकरीच मदतीस पात्र ठरले. ३२ हजार शेतकऱ्यांना डच्चू देण्यात आला. राष्ट्रीय कृषी विमा कंपनीने रबीचा पीक विमा जाहीर केला. यात जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी विमा मिळण्यास पात्र ठरले. त्यांना अडीच कोटींची मदत दिली जाणार आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, निसर्गाच्या लहरीपणातून पिकांना वाचविण्यासाठी २०१५-२०१६ मध्ये ३८ हजार ५२ शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला. त्यांनी ५२ कोटींचे पीक संरक्षीत केले होते. २०१५-२०१६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. यामुळे पीक विमा उतरविणारे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. आता गहू, हरभरा व भुईमूगासाठी विम्याचा लाभ दिला जाणार आहे. गव्हाकरिता १० तालुके, हरभऱ्याकरिता केवळ दोन तालुके, तर भुईमूगासाठी एकाच तालुक्यातील शेतकरी पात्र ठरले. गहू पिकाकरिता तीन हजार ३८९ शेतकऱ्यांना २९३९ हेक्टरकरिता एक कोटी ४९ लाख १९ हजार ३०४ रूपयांची मदत मिळणार आहे. यात यवतमाळ, केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, दिग्रस, नेर, आर्णी आणि पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. (शहर वार्ताहर) भुईमूगाकरिता तीन शेतकरी पात्र हरभऱ्याकरिता केळापूर आणि पुसद या दोनच तालुक्यातील दोन हजार ६९ शेतकऱ्यांना एक हजार ६७२ हेक्टरसाठी विमा दिला जाणार आहे. त्यांना ७५ लाख ४५ हजार ३९८ रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे. भुईमूगाच्या विम्याकरिता केवळ तीन शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. त्यांना एक लाख २६ हजार ८४० रूपयांचा विमा दावा मिळणार आहे.