शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्याचा ३२ जणांना चावा ! दिग्रसमध्ये दहशत

By अविनाश साबापुरे | Updated: June 11, 2023 15:25 IST

अँटी रेबीज सिरमसाठी यवतमाळकडे धावाधाव

दिग्रस : तीन दिवसात ३२ नागरिकांना चावा घेतलेल्या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याची दहशत शहरात तिसऱ्या दिवशीही कायम आहे. नागरिकांना घराबाहेर पडणेसुद्धा मुश्किल झाले आहे. जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

 शहरात गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशा तीन दिवसात ३२ नागरिकांना या मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. हे नागरिक ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्याने हा आकडा समोर आला. अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या दिग्रसकरांत आता पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत पसरली आहे. प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. 

राजकीय नेता अन् अधिकारीही झाला शिकारविशेष म्हणजे या कुत्र्याने एक मोठा राजकीय नेता व नगरपालिका अधिकाऱ्यांना चावा घेतला. या सर्वांनी ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन उपचार घेतले. मात्र अँटी रेबीज सिरम हे इंजेक्शन जिल्हा ठिकाणीच उपलब्ध असल्याने या रुग्णांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात जावे लागत आहे. काळ्या रंगाचे शेपूट तुटलेले हे कुत्रे सरळ अंगावर येऊन चावा घेत आहे. मागील तीन दिवसात देवनगर, शंकर टॉकीज, नगर परिषद, वाल्मिक नगर, दिनबाई शाळा परिसर, तहसील परिसर, गुरुदेवनगर या परिसरातील नागरिकांसह वाटसरूंना चावल्याची माहिती आहे. नगर पालिका प्रशासनाने या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कुत्र्याला मारण्याची परवानगी का नाही?कुत्र्याला ठार मारण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषद गाठली. त्यावेळी आम्ही कुत्र्याचा शोध घेत आहोत. मात्र त्याचा बंदोबस्त कसा करायचा? कारण नगरपरिषदेला कुत्र्याला मारण्याची परवानगी नाही, असे सांगून नगरपरिषद प्रशासनाने आपली जबाबदारी ढकलली. वाघाला मारण्याची परवानगी मिळू शकते तर मग कुत्र्याला मारण्याची परवानगी शासन का देत नाही, असा सवाल संतप्त नागरिक करीत आहे. जिल्हा प्रशासनाने नगरपरिषद व वनविभागाच्या माध्यमातून शोधमोहीम राबवून या कुत्र्याची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :dogकुत्रा