शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

३१ महिन्यांत वाघाने घेतले १२ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:43 PM

गेल्या ३१ महिन्यांत राळेगाव तालुक्यातील १० व केळापूर तालुक्यातील दोन अशा, १२ नागरिकांचे वाघाने बळी घेतले. या दोन तालुक्यातील १६ गावांतील २० हजार ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहे. या वाघाचा पाच ते सात हजार हेक्टर जंगल क्षेत्रात वावर आहे.

ठळक मुद्देदोन तालुके, १६ गावे दहशतीत : २० हजार नागरिकांवर परिणाम, वन विभागाविरूद्ध रोष

के.एस. वर्र्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : गेल्या ३१ महिन्यांत राळेगाव तालुक्यातील १० व केळापूर तालुक्यातील दोन अशा, १२ नागरिकांचे वाघाने बळी घेतले. या दोन तालुक्यातील १६ गावांतील २० हजार ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहे. या वाघाचा पाच ते सात हजार हेक्टर जंगल क्षेत्रात वावर आहे.पावसाळ्यात सर्वाधिक, हिवाळ्यात कमी, तर उन्हाळ्यात अपवादात्मक हल्ले वाघांनी केले आहे. शनिवार, रविवार व सणाच्या दिवसात हल्ल्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने आगामी काळात चिंता वाढली आहे. मात्र वन विभाग या वाघाचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरला आहे. वाघाने रामजी शेंदरे, रा.लोणी यांचा २७ जानेवारी २०१८ रोजी दहावा बळी घेतल्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांनी वाघिणीस ठार मारण्याचा आदेश दिला होता. ३० जानेवारीला वन्यप्रेमी सरीना सुब्रण्यम व डॉ. जेरील वनाईत यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने वाघ मारण्याच्या आदेशाला स्थगनादेश दिला. त्यांनी वाघिण गर्भार आहे, वाघिणीची योग्य ओळख पटविण्यात आलीे नाही, १२ पैकी केवळ तीनच बळी वाघिणीने घेतले, इतर बळी दुसऱ्या वाघाने घेतल्याने संशयास्पद स्थिती असल्याचे याचिकेत नमूद केले होते.तत्पूर्वी एनटीसीत (नॅशनल टायगर कंझरवेन आथरिटी) डेहराडूनच्या पथकाने केळापूर तालुक्यात दौरा करून माहिती घेतली. नेमका त्याच वेळी वाघाने दहावा बळी घेतला. त्यापूर्वी १६ सप्टेबर २०१७ रोजी राळेगाचे एसडीओ संदीपकुमार अपार यांचे शासकीय वाहन वन विभागाचे वाहन समजून सखी येथे गावकºयांनी जाळले होते. नंतर २८ जानेवारी २०१८ रोजी मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी राळेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता. यामुळेच २४ फेब्रुवारी २०१८ रोजी मुख्य वनसंरक्षक चव्हाण यांची पुण्याला बदली आहे. नंतर २४ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव) नागपूर श्रीराम बाबू यांनी वाघ पिडीत क्षेत्रातील अनेक गावांना भेटी दिल्या. काही निर्देश दिले. मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आहे.१० आॅक्टोबर २०१८ रोजी वाघ पिडीत ग्रामीणांचा राळेगाव उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला. त्यानंतर ‘टी वन टायगर मिशन’ अनेक प्रयत्नानंतरही अपयशी ठरले. उपविभागीय अधिकाºयांचे शासकीय वाहन जाळल्यानंतर शासनाद्वारे तडकाफडकी अनेक उपाययोजना सुरू करण्यात आल्या. टी.वन टायगर मिशन त्यापैकी एक होते. सप्टेबर २०१७ च्या अखेर ते जानेवारी २०१८ च्या मध्यापर्यंत, या अंतर्गत या क्षेत्रात ६० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. अनेक ठिकाणी उंच मचाणी लावण्यात आल्या. पाच ठिकाणी वाघास पकडण्याकरिता पिंजºयात जिवंत शिकार ठेवण्यात आल्या. २५ वाहनांद्वारे पाच वनक्षेत्रातील १०० तज्ज्ञ वन कर्मचाऱ्यांचे व प्रत्येक पथकात तरबेज शुटर असलेली पथके कामी लावण्यात आली होती. ताडोबा येथील ‘गणराज’ हत्तीला वाघाच्या शोधार्थ पाचारण करण्यात आले होते. मात्र हत्ती मदहोश झाल्याने २० किलोमीटर पळून गेला. याशिवाय हैद्राबाद, बेंगलोर, दिल्ली येथील खासगी शार्प शुटर येऊन रिकाम्या हाताने परतले. वन खात्यातील तामिळनाडू येथील तज्ज्ञांनीसुद्धा येथे भेटी देऊन तळ ठोकला. टिप्स दिल्या. पण त्याचाही उपयोग झाला नाही.(१) सोनाबाई भोसले, बोराटी, ६.१,२०१६, (२) मारोती नागोसे, रा.खैरगाव, ९/३/२०१६, (३) सखाराम टेकाम, झोटींगधरा, ९/४/२०१६, (४) प्रवीण सोनवणे, तेजनी, ३०/१०/२०१६, (५) लक्ष्मी रामपूरे, जिरामिरा (केळापूर), २२/७/२०१७, (६) गजानन पवार, सराटी, २५/८/२०१७, (७) सतीश कोवे, सखी, १६/९/२०१७, (८) शंकर आत्राम, जिरा (केळापूर), १५/१०/२०१७, (९) चटकू फुकटी, विहीरगाव, १२/९/२०१७, (१०) रामजी शेंदरे, लोणी, २७/८/२०१८, (११)गुलाब मोकाशी, वेडशी, ४/८/२०१८, (१२) वाघू राऊत, विहीरगाव, ११/८/२०१८.

टॅग्स :Tigerवाघ