शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या २१ ऑगस्ट रोजी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:07 IST

राज्यभरातील ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या व ६१५ उपबाजार समित्यांनी शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनव्या कायद्याला विरोध ‘एपीएमसी’च्या अस्तित्वावरच गदा, शेतकऱ्यांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रचलन व सुविधा) अध्यादेश २०२० ची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. हा कायदा शेतकरी व बाजार समित्यांच्या जीवावर उठणारा असल्याचे सांगत राज्यभरातील ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या व ६१५ उपबाजार समित्यांनी शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा जिल्ह्यातील कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ‘कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यापाऱ्यांवरील नियंत्रण संपुष्टात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १२ ऑगस्ट रोजी सर्व प्रथम वृत्त प्रकाशित करून या नव्या कायद्याकडे राज्यभरातील सहकार, पणन क्षेत्र व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले होते. या नव्या कायद्यामुळे शासन खेडा खरेदीला प्रोत्साहन देत असून त्यातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट होण्याची तसेच बाजार समित्यांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती वृत्तात वर्तविली होती.

‘लोकमत’च्या वृत्तानंतर राज्यभरातील सहकार क्षेत्र, बाजार समित्यांचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी व शेतकरी जागृत झाले. त्यांनीही या कायद्याच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध दर्शविला आहे. या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करू नये अशी मागणी राज्य सरकारकडे केली जात आहे.

कायद्यातील अटी अत्यंत जाचकहा नवा कायदा कसा अन्यायकारक आहे, याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यातील अटी अत्यंत जाचक आहे, शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या बाजार समित्या अडचणीत येणार आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाहीच हे सरकारला पटवून देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी भविष्यातही आणखी वेगवेगळ्या टप्प्यावर व नव्या स्वरूपात आंदोलने केली जाणार असल्याचे प्रवीण देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agricultureशेती