शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांपैकी ३०० जणांना ‘हाय ब्लड प्रेशर’

By admin | Updated: May 21, 2017 00:32 IST

रक्तदाब तपासणीकडे सर्वसामान्य माणूस दुर्लक्ष करतो आणि त्यातूनच गंभीर आजार उद्भवतात.

आयएमएची तपासणी : गर्दीच्या ठिकाणी केली मोफत तपासणी, जनजागृती रॅलीत विविध संघटनांचा सहभाग लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : रक्तदाब तपासणीकडे सर्वसामान्य माणूस दुर्लक्ष करतो आणि त्यातूनच गंभीर आजार उद्भवतात. हीच बाब हेरून यवतमाळातील डॉक्टरांनी चक्क रस्त्यावर उतरून दिवसभरात दोन हजार लोकांचे बीपी तपासले. गंभीर बाब म्हणजे, त्यात तब्बल ३०० जणांना उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) असल्याचे निष्पन्न झाले. जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे हा आगळा उपक्रम राबविण्यात आला. जेथे लोकांची गर्दी असते अशा ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी जाऊन नागरिकांची मोफत रक्तदाब तपासणी केली. यामध्ये बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय अशा ठिकाणांचा समावेश होता. तत्पूर्वी जनजागृती रॅली काढण्यात आली. यात डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय प्रतिनिधींच्या संघटना सहभागी झाल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धोटे यांनी आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. बी.एस.येलके यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित ३०० शेतकऱ्यांची रक्तदाब तपासणी डॉ. हर्षवर्धन बोरा यांनी केली. तसेच स्लाईड शोद्वारे मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनीही सेवेचा लाभ घेतला. बसस्थानकावर डॉ. भरत राठोड यांनी स्लाईड शोद्वारे मार्गदर्शन केले. या उपक्रमात आयएमएसह आयएमएची लेडीज विंग, बालरोग तज्ज्ञ संघटना, स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना, वैद्यकीय प्रतिनिधींचा एमएसएमआरए, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मार्ड आणि इतर संघटनांनी सहभाग घेतला. अशा प्रकारचे वेगवेगळे लोकोपयोगी उपक्रम याहीपुढे घेणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा आणि सचिव डॉ. स्वप्नील मानकर यांनी सांगितले.