शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कळंब येथे ३० लाखांचे शौचालय ‘सिल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:22 IST

येथील पारवेकरनगरात १४ वित्त आयोगातून ३० लाख रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. काम पूर्ण होऊनही वापरासाठी खुले न करता शौचालयाला ‘सिल’ ठोकण्याचा अजब प्रकार पुढे आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील पारवेकरनगरात १४ वित्त आयोगातून ३० लाख रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. काम पूर्ण होऊनही वापरासाठी खुले न करता शौचालयाला ‘सिल’ ठोकण्याचा अजब प्रकार पुढे आला आहे.पारवेकरनगर, कोलाम पोड वस्ती आदी भागातील लोकांना वैयक्तिक लाभाची शौचालय योजना देण्यात आली. ज्यांच्याकडे शौचालय बांधण्यासाठी जागा नाही, अशांसाठी नगरपंचायतीने या भागात सार्वजनिक शौचालय बांधाले. काम पूर्ण होऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी झाला. परंतु लोकांसाठी खुले करण्यात आले नाही. या परिसरातील नागरिक उघड्यावर शौचास जात आहे.या शौचालयाच्या बाजूला असलेल्या सरकारी जागेवर दोन धर्माच्या लोकांनी दावा ठोकला आहे. यासाठी निवेदनही देण्यात आले. परंतु प्रशासकीयस्तरावर कुठलाही तोडगा काढण्यात कुणीही पुढाकार घेतला नाही. नगरपंचायत ते कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या प्रशासनानेही केवळ बघ्याची भूमिका घेतली. दुसरीकडे नव्याने बांधलेल्या शौचालयाला ‘सील’ ठोकण्यात आले.तसे पाहिले तर शौचालय आणि जागेचा वाद हे दोन वेगळे विषय आहे. जागेच्या वादात शौचालयाला सील लावले, हे कोणीही सांगायला तयार नाही. कारण शौचालयाचा वापर सर्वांसाठीच राहणार आहे. जागेचा वाद बाजूला ठेऊन शौचालयाचे ‘सिल’ काढावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.शौचालयाच्या बाजूला असलेल्या जागेचा वाद सुरू आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, म्हणून सील ठोकण्यात आले. यावर लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.- मनोज काळे, उपाध्यक्ष,नगर पंचायत, कळंब