शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

२७ लाख नागरिक ‘आधार’च्या कक्षेत

By admin | Updated: May 16, 2017 01:28 IST

शासनाच्या विविध योजना व इतर सर्व महत्वपूर्ण कामांसाठी ‘आधार’ कार्ड आता अनिवार्य झाले आहे.

आॅनलाईन मदत : जिल्ह्यातील कार्यरत केंद्रांची यादी संकेतस्थळावर, आणखी दोन लाख नागरिकांना हवा आधारसुहास सुपासे । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या विविध योजना व इतर सर्व महत्वपूर्ण कामांसाठी ‘आधार’ कार्ड आता अनिवार्य झाले आहे. ते पाहता जिल्ह्यात गेल्या काही वर्षात आधार नोंदणीची मोहीम जोरात राबविण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून डिसेंबर २०१६ पर्यंत जिल्ह्यातील २७ लाख नागरिक आधार च्या कक्षेत आले असून मे २०१७ पर्यंत या आकड्यात आणखी भर पडली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपली स्वतंत्र ओळख (युआयडी) निर्माण करण्यासाठी आधार नोंदणी करण्याची मोहीम शासनाकडून राबविण्यात येत आहे. आधार कार्ड हे शासनाच्या सर्व योजना व बँकींग कामांसाठी आवश्यक आहे. जिल्ह्यात २७ लाख म्हणजे ९२ टक्के नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. तर उर्वरित दोन लाख २४ हजार नागरिकांची आधार नोंदणी करण्यासाठी १८० केंद्र तालुका व गावस्तरावर कार्यरत असल्याचा शासनाचा दावा आहे. या सर्व केंद्रांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यातील काही केंद्र तहसील कार्यालयात कायमस्वरुपी लावण्यात सुरू आहेत. आधार नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे व संपूर्ण प्रक्रिया व अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. आधार कार्डपासून वंचित असलेल्यांनी लाभ घेऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.आधार मदत केंद्र नागरिकांच्या आधार कार्ड विषयी विविध अडचणी लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात आधार मदत केंद्र उघडण्यात आले आहे. नागरिकांच्या आधार कार्ड विषयी कोणत्याही अडचणी असल्यास ते ९४०५४२२२०० या मोबाईल क्रमांकावर व्हॉटस्अ‍ॅप किंवा एसएमएस द्वारा इमेज व संदेश पाठवू शकतील. संदेश पाठविताना आधार नोंदणी पावतीचा २८ आकडी क्रमांक किंवा पावती स्कॅन करून पाठवू शकता. आधार नोंदणी करताना दिलेल्या रजिस्टर नोंदणी मोबाईल वरूनच संदेश पाठवायचा आहे. इतर मोबाईल क्रमांकावरून संदेश पाठविताना कोणतेही एक ओळखपत्र स्कॅन करून पाठवावे. ज्यांच्याकडे आधार नोंदणी पावती आहे, परंतु त्यांना अद्याप आधार कार्ड मिळाले नाही, अशा नागरिकांनी या क्रमांकावर संदेश पाठवायचा आहे. परंतु या क्रमांकावर फोन करता येणार नाही, तसेच इतर कोणतीही इमेज पाठवू नये. ही सेवा केवळ यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठीच आहे. ‘आधार’कार्ड काढण्याचा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध सुरू आहे. ९३ टक्केहून अधिक नोंदणी झाली आहे. शहरी भागानंतर आता ग्रामीण भागात आम्ही स्वत: जाऊन जे नागरिक अद्यापही आधार पासून वंचित आहे, त्यांची नोंदणी करीत आहो. त्यासाठी पोलीस पाटील व इतर नागरिकांचे सहकार्य घेत आहो. आवश्यक ते प्रमाणपत्र जाग्यावर उपलब्ध करून देत आहो. - सचिन शेजाळ, तहसीलदार, यवतमाळ .