शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बस अपघातात २७ जखमी

By admin | Updated: January 7, 2016 03:00 IST

समोरुन येणाऱ्या इंडिकाला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले.

तिवरंगजवळची घटना : इंडिका वाचविताना बसच्या तीन पलट्या आर्णी : समोरुन येणाऱ्या इंडिकाला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले. हा अपघात आर्णी-माहूर मार्गावरील तिवरंग फाट्याजवळ बुधवारी सकाळी १० वाजता घडला. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. एसटी बस (एम.एच.४०-वाय-५८४२) बुधवारी सकाळी हिंगणघाटवरून माहूरकडे जात होती. आर्णी माहूर दरम्यान तिवरंग फाट्यावरील वळणाजवळ समोरुन अचानक इंडिका कार आली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस चालकाचे नियंत्रण गेले आणि बसने तीन पलट्या खाल्ल्या. अपघात झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. जखमींना आर्णी येथे दाखल करण्यात आले. तर तीन गंभीर जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. महामार्ग पोलिसांनी जखमींना मदत केली. या अपघातात वर्षा आलेवार (४०) ताडसावळी, श्रीराम मोल्यावार (५०) वर्धा, प्राजक्ता अल्लीवार (१८) ताडसावळी, सविता दत्तात्रय गिरगावकर (६७) अमरावती, दत्तात्रय सदाशिव गिरगावकर (७२) अमरावती, संध्या येरावार (५०) यवतमाळ, विष्णू राठोड (२१) केळझरा, सीताराम बोर्लेवार (६०) आर्णी, शेख राजीक शेख दाऊद (३८) आर्णी, तुळसाबाई डोळे (७५) सोनखास, पुंजाबाई गणपत डोळे (७५) सोनखास, दीपक देवीदास येरावार (६४) यवतमाळ, संतोष खांडू पवार (३८) रतननाईकनगर, अभिजित लाभसेटवार (२७) यवतमाळ, विजय नारायण मुनेश्वर (६५) यवतमाळ, शोभा दीपक येरावार (५८) यवतमाळ, स्वप्नील रमेश चिंतावार (३५) आर्णी, किशोर कृष्णराव कारंजेकर (३६) वर्धा, अर्चना किशोर कारंजेकर (३८) रा. वर्धा, महिमा बी (७०) रा. वसमत, कृष्णा वासुदेव चिंतावार (२९) उदयनगर नांदेड, बस चालक अब्दूल सालेम (४९), वाहक श्रीकांत वासू मडावी आणि इंडिका मालक-चालक संजय ग्यानबा सावळे (४२) रा. नवामोंढा नांदेड यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)