शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

रिअल इस्टेटमध्ये २६ लाखांनी गंडा

By admin | Updated: June 24, 2015 00:07 IST

बोगस सातबाराच्या आधारे अमरावतीच्या व्यापाऱ्याची २६ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली.

अमरावतीचा व्यापारी : नेर येथील युवकास अटक, सातबारा बोगसनेर : बोगस सातबाराच्या आधारे अमरावतीच्या व्यापाऱ्याची २६ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी येथील अशोक रामदास वयले (३५) याला अमरावती पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अमरावती येथील रतनलाल कन्हैयालाल भुतडा (६७) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी अशोक रामदास वयले (नेर), प्रकाश वामन वानखडे (नागपूर), नारायण अमृत अडेकर (अमरावती) यांच्याशी त्यांनी दाखविलेल्या सातबाराच्या आधारावर शेती आणि प्लॉटचा सौदा केला. इसारापोटी २६ लाख रुपयांचा धनादेश देवून नोटरी करून घेतली. त्याच दिवशी खरेदीची तारीख ठरविण्यात आली. मात्र सदर तिघेही यादिवशी हजर झाले नाही. दरम्यान, रतनलाल भुतडा यांनी सातबाराची शहानिशा केली. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सदर तिघांनी दाखविलेल्या सातबारावरील शेत आणि प्लॉट बुलडाणा अर्बनकडे तारण असल्याचे स्पष्ट झाले. भुतडा यांनी अमरावतीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात १० मे रोजी तक्रार नोंदविली. या ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, मुरलीधर डोईजड, यादव यांनी मंगळवारी अशोक वयले याला त्याच्या कृषी केंद्रातून अटक केली. त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही अशोक वयले याला बुलडाणा अर्बन सोसायटीत खोटे दस्तावेज प्रकरण आणि कृषी विभागाच्या स्प्रिंकलरप्रकरणी फसवणुकीच्या आरोपात अटक झाली होती. (तालुका प्रतिनिधी)बुलडाणा अर्बनकडे मालमत्ता तारणगट क्र.२३७ मधील दोन हेक्टर २१ आर पिंपरी कलगा शिवारातील शेत. गट क्र. २७४ मधील दोन हेक्टर आणि गट क्र. २७२ मधील एक हेक्टर ४० आर शेत. किरणनगरमधील सहा हजार चौरस फूट प्लॉट. ही सर्व मालमत्ता बुलडाणा अर्बन सोसायटीकडे तारण आहे.