शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

२५० कोटी कर्ज पुनर्गठणाची तयारी

By admin | Updated: December 28, 2015 02:48 IST

सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हादरले आहेत. अशा स्थितीत ज्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही,

नवे धोरण ठरतेय : आयुक्तांनी मागितला कर्ज रूपांतराचा अहवाल रूपेश उत्तरवार यवतमाळ सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हादरले आहेत. अशा स्थितीत ज्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही, त्या शेतकऱ्यांना बँकेने कर्ज नाकारले. यामुळे शेतकऱ्यांंना सावकाराकडे धाव घ्यावी लागली. अशा २०१२-१३ च्या थकीत कर्जाचे पुनर्गठण करण्यासाठी सहकार विभागाने अहवाल मागविला आहे. नाबार्डच्या सल्ल्यानुसार राज्य शासन धोरण ठरविणार आहे. सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यातील २०४७ गावांची आणेवारी ५० टक्केच्या आत आली होती. यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात नाबार्डच्या धोरणानुसार कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन दिले होते. अधिवेशन संपताच सहकार आयुुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा हवाला देत २०१२-१३ आणि २०१३-१४ चा अहवाल मागविला आहे. २०१३-१४ मध्ये जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्केच्या वर आहे. २०१२-१३ मध्ये जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. दुष्काळ घोषित झालेल्या वर्षी जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांना २५० कोेटी रूपयांच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. सहकार विभागाने अहवाल मागविला आहे. यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणाबाबत नाबार्डच्या सल्ल्यानुसार धोरण ठरविले जाणार आहे. यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांपुढील नवीन कर्जाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.