शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

प्रकल्पग्रस्तांना मिळणार २५ कोटींचा मोबदला

By admin | Updated: November 8, 2015 02:24 IST

वेकोलिच्या वणी नार्थ क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना चार वर्षानंतर अखेर न्याय मिळाला.

वणी : वेकोलिच्या वणी नार्थ क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना चार वर्षानंतर अखेर न्याय मिळाला. वेकोलिने संपादीत केलेल्या शेतीचा शेतकऱ्यांना २५ पट मोबदला मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी मालामाल होणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. वेकोलिने जुनाड खाणीसाठी २०११ मध्ये जुनाड, पिंपळगाव व बोरगाव येथील शेतकऱ्यांची ३२० एकर शेती संपादित केली. त्यावेळच्या ब्रिटीशकालीन कायद्यानुसार शेतकऱ्यांना वेकोलिकडून केवळ ३५ हजार रूपये प्रति एकर दराने मोबदला देण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यासाठी वेकोलिकडून टाळाटाळ झाली. शेतकऱ्यांनी वेळोवेळी तत्कालीन खासदार हंसराज अहीर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने केली. अहीर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या व्यथांना प्राधान्य देऊन वेकोलि प्रशासनाशी संघर्ष केला. त्यामुळे वेकोलिने अखेर ९४ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले व जमीन अधिग्राणाचा कायदा बदलून प्रकल्पग्रस्तांच्या शेतीला सन्मानजनक मोबदला देण्याचे मान्य केले. आता शेतकऱ्यांना आठ ते नऊ लाख रूपये प्रति एकर दराने मोबदला मिळणार आहे. या वाढीव दराच्या फरकाचे २५ कोटी रूपयांचे वितरण वेकोलितर्फे रविवारी केले जाणार आहे. यासाठी भालर, जुनाड रोडवरील वेल्हाळा मंदिराच्या प्रांगणात रविवारी सकाळी ११ वाजता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, वेकोलिचे सहप्रबंधक राजीव रंजन मिश्र, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वेकोलिचे तांत्रिक निदेशक एस.एस.मल्ही व कार्मिक निदेशक डॉ.संजयकुमार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यमंत्री अहीर यांच्याहस्ते शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र डांगे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, वैदेही नायगावकर, तारेंद्र बोर्डे, संजय पिंपळशेंडे, रवी बेलूरकर, उमा पिदूरकर व वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक डी.एम.गोखले यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)