शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

१३२ जागांसाठी २४ हजार उमेदवार

By admin | Updated: October 27, 2014 22:43 IST

जिल्हा परिषदेच्या जम्बो पदभरतीला २ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असून या परीक्षेसाठी दिवाळी संपताच कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. १३२ जागांसाठी तब्बल २४ हजार ५५२ उमेदवार परीक्षा देणार आहे.

जिल्हा परिषदेची जम्बो पदभरती : सुटीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांची धावपळ यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या जम्बो पदभरतीला २ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असून या परीक्षेसाठी दिवाळी संपताच कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. १३२ जागांसाठी तब्बल २४ हजार ५५२ उमेदवार परीक्षा देणार आहे. सध्या शाळांना सुट्या असल्याने परीक्षा केंद्रांसाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा अडचणीत सापडली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेने जम्बो पदभरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. यासाठी २, ८, ९, १६ आणि २२ नोव्हेंबरला परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. या परीक्षेसाठी शासकीय आणि खासगी शाळा घेण्यात येणार आहे. मात्र दिवाळीच्या सुट्यांमुळे शाळा मिळण्यास अडचणी येत आहे. २ नोव्हेंबरला कृषी विस्तार अधिकाऱ्यांच्या दोन पदाची परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी २४४ उमेदवार आहेत. कनिष्ठ अभियंता पदासाठी १८१ उमेदवार परीक्षा देणार असून प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या एका जागेसाठी ६४ उमेदवार परीक्षा देणार आहे. तारतंत्रीच्या एका जागेसाठी १०३ उमेदवार राहणार आहे. ८ नोव्हेंबरला वरिष्ठ सहाय्यक लेखा या चार जागांसाठी ३९७ उमेदवार, औषध निर्माण अधिकारीच्या एका पदासाठी १८२ उमेदवार, हंगामी आरोग्य सेवक पुरूष सेवक फवारणी पदासाठी ५२९ उमेदवार परीक्षा देणार आहेत. ९ नोव्हेंबरला कंत्राटी ग्रामसेवकाच्या १३ पदांसाठी १०३९ उमेदवार परीक्षा देणार आहेत. स्थापत्य अभियंत्रा सहाय्यकाच्या ४० पदासाठी १२९९ उमेदवार परीक्षेला बसणार आहे. १६ नोव्हेंबरला कनिष्ठ साहाय्यक लेखाच्या तीन पदांसाठी ५७९ उमेदवार, २२ नोव्हेंबरला विस्तार अधिकारी सांखिकी पदासाठी १२७३ उमेदवार आणि लघुलेखकाच्या एका जागेसाठी ५१ उमेदवार, कनिष्ठ लेखाधिकाऱ्याच्या तीन जागेसाठी ३०३ आणि परिचराच्या ४५ जागांसाठी १८ हजार १५३ उमेदवार परीक्षेला बसणार आहे.(शहर वार्ताहर)