शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तांच्या लाभाची २४ प्रकरणे रखडली

By admin | Updated: January 28, 2015 23:42 IST

जिल्हा पोलीस दलाचा लिपिकवर्गीय कारभार कमालीचा ढेपाळला आहे. त्यातूनच एक-दोन नव्हेतर सुमारे २४ सेवानिवृत्तांच्या लाभाची प्रकरणे रखडली आहे. लालफितशाहीत अडकवून ठेवलेल्या

यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाचा लिपिकवर्गीय कारभार कमालीचा ढेपाळला आहे. त्यातूनच एक-दोन नव्हेतर सुमारे २४ सेवानिवृत्तांच्या लाभाची प्रकरणे रखडली आहे. लालफितशाहीत अडकवून ठेवलेल्या या प्रकरणात सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशालाही मूठमाती देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक ते दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी सेवानिवृत्तीला उलटूनही अद्याप लाभाची प्रकरणे प्रलंबित असल्याने असंतोष व्यक्त होत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी भविष्य निर्वाह निधीची रक्कम प्रदान करता यावी यासाठी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंतिम प्रदानाचा प्रस्ताव एक वर्षापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास विलंबामुळे प्रदान कराव्या लागणाऱ्या व्याजाची वसुली दोषी असणाऱ्यांकडून करण्याचे आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्षभऱ्यापूर्वी काढले आहे. शिवाय या आदेशात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे विविध लाभ तत्काळ देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न करावे, असेही म्हटले आहे. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत जिल्हा पोलीस दलातील सुमारे २४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध लाभांची प्रकरणे एक ते दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. आर्थिक लाभ मिळावा यासाठी सेवानिवृत्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापना विभागाचे उंबरठे झिजवताना दिसतात. पाठपुरावा करूनही सेवानिवृत्तांना लाभ मिळत नाही. या संदर्भात वर्षभरापूर्वी मुकुटबन पोलीस ठाण्यातून सेवानिवृत्त झालेले सहाय्यक फौजदार सुभाष वांढरे यांनी वेळोवेळी स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. स्वत:बरोबरच इतर सेवानिवृत्तांच्या अडचणी समजावून सांगितल्या. मात्र कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे आजतागायत त्यांची आर्थिक लाभाची प्रकरणे प्रलंबित आहे. अखेर हताश होवून त्यांनी थेट राज्याचे पोलीस महासंचालक, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि राज्याच्या महालेखाकारांकडे तक्रारी केल्या आहेत. आता तरी दखल घेऊन लाभाची रक्कम पदरात पडेल अशी या सेवानिवृत्तांना अपेक्षा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)